केपटाऊन, 14 मे : सामान्यपणे माणूस दिसला की सिंह हल्ला करतो. त्यामुळेच सिंह दिसला की माणसांना घाम फुटतो आणि माणसं सिंहापासून आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढतात. मग सिंहाशी माणसाशी मैत्री याचा विचार कुणी स्वप्नातही करणार नाही. पण एका व्यक्तीने तशी हिंमत केली. त्याने सिंहासमोर आपला मैत्रीचा हात पुढे केला. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही (Man friendship with lion). तशी माणसांची प्राण्यांशी मैत्री असते. पण सिंहाशी मैत्री कोण कधी काय करू शकतो आणि जरी सिंहाशी मैत्री करण्याचा प्रयत्न कुणी केला तर त्याचं काय होईल, याची कल्पनाही न केलेलीच बरी. असं असताना या व्यक्तीने तशी हिंमत केली आणि त्याचं पुढे जे झालं ते शॉकिंग आहे. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक सिंह दिसतो. हा सिंह एकटा नाही. तर त्याच्यासोबत एक माणूसही दिसतो. आता माणूस दिसल्यानंतर सिंहाने जसं रिअॅक्ट होणं अपेक्षित होतं तसा तो बिलकुल रिअॅक्ट झालेला नाही. ना सिंहाने या माणसावर हल्ला केला आणि माणूस या सिंहाला घाबरताना दिसतो. उलट तो हसत हसत, आनंदात या सिंहासोबत खेळतो आहे. दोघंही एकत्र मस्ती करताना, फिरताना दिसत आहेत.
एरवी सिंह माणसांना पाहताच हल्ला करतात पण हा सिंह मात्र जसे श्वान आपल्या मालकांना पाहून आनंदी होतात अगदी तसाच आनंदी होताना दिसतो आहे आणि पाळीव प्राण्याप्रमाणे तो त्या व्यक्तीवर प्रेम करतो. ती व्यक्ती या सिंहाला आपल्या मिठीत घेते, त्याच्या गळ्याभोवती हात टाकते. इतकंच नव्हे तर त्याला किसही करते. पण सिंह त्याला काहीच करत नाही. उलट तोसुद्धा तितकंच त्याच्यावर प्रेम करताना दिसतो. हे वाचा - चमत्कार! शेकडो लोकांचा बळी गेला पण अवघा 9 वर्षांचा चिमुकला एकटाच भयंकर Plane crash मधूनही बचावला या व्हिडीओतील व्यक्तीचं नाव शँडोर लारेन्टी आहे. त्यानेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये माहितीनुसार हा व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेचा आहे. या सिंहाचं नाव जॉर्ज आहे. या दोघांची गेल्या 10 वर्षांपासूनची मैत्री आहे. या दोघांचे असे बरेच व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतील.