व्हिडीओत पाहू शकता तरुणाने आपल्या तोंडात सिगारेट धरली आहे. त्यानंतर तो लायटर हातात घेतो आणि त्याने सिगारेट पेटवत नाही तर बाइकची टाकी उघडून तिथं आग लावतो. त्यानंतर सिगारेट ठेवलेलं आपलं तोंड या आगीजवळ नेतो आणि त्यावर सिगारेट पेटवतो. असं काहीतरी कऱण्यात या तरुणाला मजा वाटत असेल. आपण काहीतरी डेअरिंगबाज कृत्यं करत आहोत, याचा गर्वही त्याला वाटत असेल. पण तो जे काही करतो आहे, ते जीवघेणंही ठरू शकतं. हे वाचा - Shocking video! धुराचे लोट सोडत हवेत उडून जमिनीवर धाडकन कोसळली कार; भयंकर अपघातातूनही बचावला ड्रायव्हर ghantaa इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. काही जणांनी या तरुणाच्या हिंमतीला दाद दिली आहे. तर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. तर काही जण मजेशीर कमेंटही करत आहेत. अशा संमिश्र प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहून येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking viral video, Viral, Viral videos