जाहिरात
मराठी बातम्या / Viral / इमारतीच्या 9 मजल्यावरुन थेट BMW कारवर कोसळला व्यक्ती; पुढे जे घडलं ते जाणून व्हाल थक्क

इमारतीच्या 9 मजल्यावरुन थेट BMW कारवर कोसळला व्यक्ती; पुढे जे घडलं ते जाणून व्हाल थक्क

इमारतीच्या 9 मजल्यावरुन थेट BMW कारवर कोसळला व्यक्ती; पुढे जे घडलं ते जाणून व्हाल थक्क

या घटनेत एक व्यक्ती उंच इमारतीवरुन खाली उभा असलेल्या कारवर कोसळला (Man Fell from 9th Floor of Building). मात्र, तो सुखरूप आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली 31 जानेवारी : दुर्घटना कोणासोबत कधी घडेल, हे कोणीही सांगू शकत नाही. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की लोक मोठमोठ्या इमारतींवरुन कोसळतात. या घटना सर्वांनाच हैराण करणाऱ्या असतात. मात्र, आज आम्ही ज्या घटनेबद्दल बोलत आहोत, ती थोडी वेगळी आहे. या घटनेत अमेरिकेतील एक व्यक्ती उंच इमारतीवरुन खाली उभा असलेल्या कारवर कोसळला (Man Fell from 9th Floor of Building). मात्र, या घटनेत तो सुखरूप आहे. जिगरबाज कर्मचाऱ्याने आग विझवली, वसईच्या पेट्रोल पंपावर मोठा अनर्थ टळला या गोष्टीवर विश्वास बसत नसला, तरी ही घटना खरी आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एक 31 वर्षीय व्यक्ती न्यू जर्सीच्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन खाली कोसळला होता. खाली एक बीएमडब्लू कार उभा होती, यावर तो कोसळला (Man Fell on BMW Car). मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या भीषण दुर्घटनेतून तो सुखरूप बचावला. आणखी एक विशेष बाब म्हणजे एवढ्या उंचावरुन कोसळूनही त्याला चालता येत होतं. त्याने जवळ उभा असलेल्या व्यक्तीला विचारलं, की आता काय घडलं. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचा हातही तुटला होता आणि त्याला भरपूर वेदना होत होत्या. आसपास उभा असलेले लोक त्याला काळजी करू नको, रुग्णवाहिका येत आहे, असं सांगून आधार देत होते. यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याची अवस्था बिकट होत गेली. त्याला भरपूर मार लागलेला असल्याने इंटरनल इंजरी जास्त होत्या, तसंच त्याचा हातही मोडला होता आणि डोक्यालाही भरपूर मार लागला होता. दोन महिने रुग्णालयात राहिल्यानंतर मागील महिन्यात हा व्यक्ती पूर्णपणे बरा झाला आणि त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. स्टँडवर उभा असताना अचानक चालत्या बसखाली गेला तरुण; थरकाप उडवणारा VIDEO न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, लोकांनी सांगितलं की त्याला इतक्या वेदना होत होत्या की तो अक्षरशः वेदनेनं ओरडत होता. तो हेच म्हणत होता की मला मरायचं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती तिथे काम करत नव्हता, जिथून तो पडला. तिथे उपस्थित लोकांना फक्त काच तुटल्याचा आवाज आला आणि नेमकं काय घडलं हे समजण्याआधी हा व्यक्ती कारवर कोसळला. तो इमारतीवरुन खाली कसा कोसळला, हे समजू शकलं नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात