ना दोरीचा आधार ना सुरक्षा कवच; स्पायडर मॅनसारखा भरभर उंच इमारतीवर चढला तरुण, पाहा VIDEO

ना दोरीचा आधार ना सुरक्षा कवच; स्पायडर मॅनसारखा भरभर उंच इमारतीवर चढला तरुण, पाहा VIDEO

जीवघेणे स्टंट आणि अशा पद्धतीनं इमारतीवर चढल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर: साधं इमारतीच्या टोकावर जाऊन खाली पाहिलं तरी आपल्या काळजात धडकी भरते पण एका तरुणानं सर्वात उंच इमारतीवर कोणत्याही सुरक्षा कवचाच्या मदतीशिवाय किंवा दोरीशिवाय चढण्याचा निर्णय घेतला. आपला जीव धोक्यात हा तरुण अगदी स्पायडर मॅनसारखा सर्वात उंच इमारतीवर चढताना दिसत आहे. या माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पॅरिसमधील सर्वात उंच इमारत असलेल्या ठिकाणी हा तरुण गेला. तिथे त्यानं स्पायडरमॅन सारखं इमारत चढायचं ठरवलं आणि त्यांनं शुक्रवारी संध्याकाळी चढायला सुरुवात केली. रात्री 8 वाजण्याच्या सुमाराच्या या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या तरुणाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण ऐकत नव्हता.

हे वाचा-बापाला हवा मुलगा; बाळाचे लिंग पाहण्यासाठी गर्भवती पत्नीचं पोटच कापलं

या घटनेचा व्हिडीओ समोर येताच या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जीवघेणे स्टंट आणि अशा पद्धतीनं इमारतीवर चढल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. या इमारतीची साधारण उंची 690 फूट असल्याचं सांगितलं जात आहे. आयफेल टॉवर एवढी उंच नसली तरी पॅरिसमधली सर्वात उंच इमारत म्हणून ही ओळखली जाते. जीव धोक्यात घालून अशाप्रकारे चढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हा तरुण इमारतीवर का चढत होता याचं कारण अद्याप समोर आलं नाही मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 7 हजारहून अधिक रिट्वीट्स आणि 600 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. 862.1K लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून या स्पॅडरमॅनची सोशल मीडियावर सध्या जगभरात चर्चा होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 20, 2020, 2:46 PM IST

ताज्या बातम्या