Home /News /viral /

जुन्या गाडीत आहे आलिशान घर; डबल बेड, वॉशिंग मशीनचीही आहे सोय

जुन्या गाडीत आहे आलिशान घर; डबल बेड, वॉशिंग मशीनचीही आहे सोय

जुन्या गाडीत एक आलिशान घर लंडनमधील व्यक्तीने बनवलं आहे. या घराला कॅराव्हॅन (Caravan) असंही म्हणतात. विशेषत: पर्यटनासाठी दूरवरचा प्रवास करण्यासाठी अशा प्रकारच्या वाहनाचा वापर केला जातो.

    नवी दिल्ली, 01 जून : देश-परदेशातील महानगरांमध्ये (Metropolitan Cities) सर्व सोयीसुविधांयुक्त घर भाड्याने घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेकदा शोधूनही घर सापडत नसल्याने आहे त्या जागेत तडजोड करण्याशिवाय पर्याय नसतो; पण अशातही काही व्यक्ती नामी शक्कल लढवून लोकांची मागणी पूर्ण करतात. लंडनमधील एका व्यक्तीने जुगाड करून जुन्या वाहनामध्ये स्टुडिओ प्लॅटची (Studio Flat) निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे यात डबल बेड, वॉशिंग मशीन, दरवाजे, खिडक्या असून एखाद्या छोट्याशा कुटुंबाची पूर्ण गरज भागेल, याची परिपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. ‘दैनिक भास्कर हिंदी’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जुन्या गाडीतील हे घर लंडनमधील व्यक्तीने बनवलं आहे. या घराला कॅराव्हॅन (Caravan) असंही म्हणतात. विशेषत: पर्यटनासाठी दूरवरचा प्रवास करण्यासाठी अशा प्रकारच्या वाहनाचा वापर केला जातो. यात दोन जण सहज राहू शकतात. लंडनमध्ये तयार केलेल्या या स्टुडिओ फ्लॅटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या फ्लॅटच्या मालकाने नुकतीच एक जाहिरातही दिली आहे. त्या व्यक्तीने घरातील बागेत या गाडीला उभं केलं आहे. लंडनमधील फ्लॅटच्या तुलनेत उत्तम आहे ‘गाडी घर’ लंडन शहरातील बागेमध्ये उभ्या केलेल्या या गाडी घरामध्ये आवश्यक ती सर्व सोय उपलब्ध आहे. गरजेची प्रत्येक वस्तू या गाडी घरात मिळू शकते. भाड्याने दिलं जाणारं हे घर कदाचित त्याच्या मालकानं स्वत:साठी तयार करून घेतलं असण्याची शक्यता असून, आता तो घर भाड्याने देऊन पैसे कमवण्याचा विचार करत आहे. या कॅराव्हॅनमध्ये एक डबल बेड, वॉशिंग मशीन, काही खिडक्याही आहेत. घरात प्रवेश करण्यासाठी प्रशस्त असा दरवाजाही आहे. लंडनमध्ये मिळणाऱ्या फ्लॅटच्या तुलनेत हा स्टुडिओ अतिशय उत्तम आहे; पण तो फ्लॅटपेक्षा अधिक महाग पडत आहे. महिन्याचं भाडं 77 हजार रुपये ‘मिरर’च्या रिपोर्टनुसार, गाडी घराच्या मालकाने या कॅराव्हॅनचं भाडं 790 पाउंड म्हणजे जवळपास 77 हजार रुपये इतकं ठेवलं आहे. या वाहनात एक छोटंसं स्वयंपाकघरही असून यात ओव्हन, फ्रीजही आहे. स्वयंपाकघरात वरच्या बाजूला कपाटं आहेत. यात एक अत्यंत छोटं बाथरूमही आहे. एका व्यक्तीसाठी ही जागा पुरेशी आहे. या जागेचं लोकेशनही उत्तम आहे. वास्तविक हे अशा प्रकारचं घर लंडनमध्ये दरमहा 50 हजार रुपयांत भाड्याने मिळू शकतं, असं जाणकारांचे मत आहे. त्या तुलनेत या गाडीतल्या घराचं भाडं जास्तच आहे. दरम्यान, परदेशाप्रमाणे भारतातही कॅराव्हॅनमध्ये पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या सध्या वाढताना दिसून येते. अतिशय दुर्गम आणि जाण्यासाठी कठीण असलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कॅराव्हॅनचा चांगला उपयोग होतो. गाडी घर आपल्या बागेत ठेऊन त्यामधून पैसे कमावण्याची शक्कल लंडनमधील व्यक्तीने लढवली आहे.
    First published:

    Tags: Car, London

    पुढील बातम्या