लंडन, 01 जुलै : अचानक कोट्यवधी रुपये मिळाले, आपण कोट्यधीश झालो तर कुणालाही आनंद होईलच. असे एक-दोन नव्हे तर तब्बल 71 कोटी रुपये एका बँक खात्यात ट्रान्सफर करायचे आहेत. पण या पैशांसाठी दावेदारच मिळेना. हे पैसे कुणाचे, कुणाच्या खात्यात पाठवयाचे, तो करोडपती कोण याचा शोध सध्या सुरू झाला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊयात
(Searching for lottery holder).
यूकेतील हे प्रकरण आहे. एका लॉटरी तिकिटाचं 71 कोटी रुपयांचं बक्षीस लागलं आहे. लॉटरी ऑर्गेनाइझर्सनी या तिकीट नंबरची घोषणाही केली आहे. 15 दिवस झाले पण लॉटरीच्या बक्षीसाचे पैसे घ्यायला कुणीच आलं नाही आहे. हे तिकीट कुणीतरी खरेदी केलं आहे, याची माहिती लॉटरी ऑर्गेनाइझर्सला आहे त्यामुळे आता लॉटरी ऑर्गेनाइझर्सनी लॉटरी विजेत्याचा शोध सुरू केला आहे. लॉटरी जिंकणाऱ्या करोडपतीला ते शोधत आहे.
हे वाचा - 'नवरा भाड्याने देणं आहे', बायकोने सोशल मीडियावर दिली जाहिरात; कारणही आहे शॉकिंग
लोकांनी आपाआपलं लॉटरी तिकीट नीट तपासून पाहावं, असं आवाहन लॉटरी ऑर्गेनाइझर्सनी केलं आहे. ज्यांनी 18 जूनला लॉटरीचं तिकीट खरेदी केलं त्यांनी आपलं तिकिट नीट पाहावं. कदाचित कोट्यवधीची लॉटरी जिंकणारी नशीबवान व्यक्ती तुम्ही स्वतःच असाल, असं त्यांनी सांगितलं.
वॉल्व्हरहॅम्प्टनच्या मोलिनेक्स स्टेडिअममध्ये केमलोट नॅशनल लॉटरी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. जिथं लॉटरी विजेत्याबाबत सांगितलं जाईल. याशिवाय 1600 कोटी रुपयांच्या जॅकपॉट लॉटरीच्या विजेत्याची घोषणा केली जाईल.
हे वाचा - अरे बापरे! चुकून दीड कोटी पगार पोहोचला खात्यात, मालामाल झालेल्या गड्यानं नोकरी सोडली अन्..
रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात एका लॉटरी शोमध्ये एका व्यक्तीने 525 कोटी रुपये जिंकले होते. याआधी फेब्रुवारीमध्ये एका व्यक्ती 10 अब्जांपेक्षा जास्त रुपये जिंकले. जो आणि जेस थ्वाइट्स या कपलने आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी जिंकली आहे. या दाम्पत्याने जवळपास 18 अब्जांची रक्कम आपल्या नावे केली. चेल्टनहॅममध्ये राहणारं हे कपल ब्रिटनमधील आतापर्यंत सर्वात मोठी लॉटरी जिंकरणारे अब्जाधीश आहे. मे महिन्यात त्यांनी ही लॉटरी जिंकली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.