मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ऑनलाईन दिसते रुपसुंदरी, खरा चेहरा पाहिल्यावर बसतो झटका

ऑनलाईन दिसते रुपसुंदरी, खरा चेहरा पाहिल्यावर बसतो झटका

खरा चेहरा दाखवावा की मेकअपने तो अधिक सुंदर करावा, याची चर्चा सध्या रंगली आहे.

खरा चेहरा दाखवावा की मेकअपने तो अधिक सुंदर करावा, याची चर्चा सध्या रंगली आहे.

खरा चेहरा दाखवावा की मेकअपने तो अधिक सुंदर करावा, याची चर्चा सध्या रंगली आहे.

  • Published by:  desk news
नवी दिल्ली, 25 डिसेंबर: सोशल मीडियावर (Social Media) आपल्या कलात्मक मेकअपच्या (Artistic Makeup) मदतीनं अत्यंत सुंदर (beautiful looking) दिसणाऱ्या महिलेचा चेहरा प्रत्यक्षात मात्र तसा नसल्याचं लक्षात आल्यावर तिचा अनेकांनी ट्रोल (Troll) करायला सुरुवात केली आहे. तर चेहरा कसाही असला तरी त्यावर इतका सुंदर मेकअप करणाऱ्या महिलेल्या कलेला दाद द्यायला हवी, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. मेकअपवरून वाद नैसर्गिकरित्या जसे आहात तसे दिसणं योग्य की मेकअप करून कृत्रिमरित्या आपलं सौंदर्य खुलवणं योग्य, यावरून सध्या सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे. काहींच्या मते नैसर्गिक चेहराच सोशल मीडियावर दाखवणं गरजेचं आहे, तर काहींच्या मते चेहऱ्याला मेकअप करून तो अधिकाधिक सुंदर कसा दिसेल, याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं वाटतं. त्यामुळे या महिलेचं खरं रुप आणि मेकअपमुळे दिसणारं सौंदर्य यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. अनेकांनी दिला मेकअप शिकवण्याचा सल्ला महिलेचा खरा चेहरा तितका सुंदर नसल्यावरून तिला ट्रोल करणारे विकृत असल्याचं अनेकांचं मत आहे. आपला चेहरा कसा आहे, हे कुणाच्याच हातात नसतं. मात्र तो अधिकाधिक सुंदर कसा दिसेल, हे पाहणं मात्र आपल्या हातात असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. या महिलेनं उत्तम मेकअप कसा करावा, याच्या टीप्स देणं गरजेचं आहे आणि त्या आपल्याला ऐकायला नक्कीच आवडतील, असं काही युजर्सनी म्हटलं आहे. हे वाचा - वर्षाचा शेवट शेतकऱ्यांसाठी ठरणार वाईट; राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, IMDचा इशारा फॉलोअर्समध्ये वाढ हा वाद सुरु झाल्यामुळे महिलेच्या फॉलोअर्सच्या संख्येत जोरदार वाढ होत आहे.     काही युजर्स मात्र तिला ट्रोल करत असून आपले दात नीट करून घेण्याचा सल्ला देत आहेत. मात्र यामुळे विचलित न होता ही महिला स्वतःचा उल्लेख ‘कॅटफिश’ असा करत आहे.
First published:

Tags: Face, Lifestyle, Viral video.

पुढील बातम्या