मराठी बातम्या /बातम्या /Viral /काय सांगता! 'या' गावातील घरांचे स्वयंपाकघर भारतात तर बेडरूम दुसऱ्या देशात

काय सांगता! 'या' गावातील घरांचे स्वयंपाकघर भारतात तर बेडरूम दुसऱ्या देशात

देशातील एक गाव असं आहे जिथं स्वयंपाकघर भारतात केला जातो आणि झोपण्यासाठी त्या गावातील लोक दुसऱ्या देशात जातात.

देशातील एक गाव असं आहे जिथं स्वयंपाकघर भारतात केला जातो आणि झोपण्यासाठी त्या गावातील लोक दुसऱ्या देशात जातात.

देशातील एक गाव असं आहे जिथं स्वयंपाकघर भारतात केला जातो आणि झोपण्यासाठी त्या गावातील लोक दुसऱ्या देशात जातात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 5 सप्टेंबर :  भौगोलिकदृष्ट्या (Geographical) भारत देश विविधतेने नटलेला आहे. देशात काही राज्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. कुठे बर्फ पडतो तर काही ठिकाणी वाळवंटही आहे. ठराविक अंतरावर सांस्कृतिक वैविध्यही पाहायला मिळतं. भौगोलिक स्थिती पाहता देशातील काही गावांना शेवटचं गाव म्हणून दर्जा मिळालाय. भारतातील उत्तराखंडपासून (Uttarakhand) पुढे गेल्यास ईशान्य भारतात (North East) अशी अनेक गाव आहेत. या गावांबद्दल अनेकांनी ऐकलंही असेल. पण देशातील एक गाव असं आहे जिथं स्वयंपाकघर भारतात केला जातो आणि झोपण्यासाठी त्या गावातील लोक दुसऱ्या देशात जातात. ही बाब ऐकून आश्चर्य वाटेल. पण दोन देशांच्या सीमेवर हे गाव असल्याने अशी स्थिती निर्माण होत असल्याचं ‘झी न्यूज हिंदी’नं वृत्त दिलंय.

    काय आहे खासियत?

    भारत आणि म्यानमार या दोन देशांच्या सीमेवरील लोंगवा गाव (Longwa Village) भौगोलिकदृष्ट्या सीमेवर आहे. त्यामुळे घराघरांमध्ये भारत-म्यानमारदरम्यान सीमा विभागली गेल्याचं पाहायला मिळतं. इथे एका देशातून दुसऱ्या देशात जायला पासपोर्टची (Passport) आवश्यकता भासत नाही. लोंगवा हे गाव नागालँडच्या मोन जिल्ह्यात येतं. दोन देशांत या गावाची अर्धी-अर्धी वाटणी केली गेलीय. या गावाला भारताचं शेवटचं गाव म्हणूनही संबोधलं जातं.

    लोंगवा गावचं वैशिष्ट्य काय?

    इतर गावांप्रमाणे लोंगवा या गावानं त्यांची वैभवशाली इतिहासाची ओळख कायम ठेवली आहे. या गावातील लोक भारतात स्वयंपाक तयार करून जेवण करतात आणि झोपण्यासाठी मात्र ते दुसऱ्या देशात जात असल्याचं बोललं जातं. यांच्या घरातून आंतरराष्ट्रीय सीमारेषा गेल्यामुळे अनेक लोकांचं स्वयंपाकघर भारतात आहे. तर त्यांचे बेडरूम म्यानमारमध्ये येतं.

    ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं या संदर्भात एक वृत्त दिलंय. यात म्हटलं आहे की, गावचा प्रमुख हा येथील राजा असतो. त्याला ‘अंघ’ असं संबोधलं जातं. जर ‘अंघ’च्या घरात असाल तर एकाच वेळी तुम्ही म्यानमार व भारतात असाल्याचं मानलं जातं. या गावातील नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व आहे. भारतातील काही लोक शेती करण्यासाठी म्यानमारमध्ये जातात. तर काही म्यानमारमधील लोक शेती करण्यासाठी भारतात येतात. गावची प्रमुख व्यक्ती एखाद्या राजाप्रमाणे असते. या राजाला एक-दोन नव्हे अनेक पत्नी असू शकतात. या गावतील प्रमुखाचं नागालँडसह अरुणाचल प्रदेश आणि म्यानमारमध्ये 70 पेक्षा अधिक गावांत वर्चस्व आहे. याचाच अर्थ या गावच्या प्रमुखाचा आदेश दूरपर्यंत लागू असतो. या प्रमुखाला खूप मान, सन्मान दिला जातो.

    दरम्यान, देशात दोन किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांच्या सीमेवर असणारी अनेक गावं असतात. त्या गावांमधील अनेक घरं विविध राज्यांमध्ये विभागली गेली आहेत. महाराष्ट्रातही सीमेवरील गावांची संख्या खूप आहे. अनेकदा अशा गावांना प्रशासकीय सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होत असतात.

    First published:

    Tags: Myanmar, Viral