Home /News /viral /

बापरे! या महिलेनं आपल्या शरीरावर गोंदवलेत असंख्य टॅटूज, खर्च केले आहेत इतके पैसे

बापरे! या महिलेनं आपल्या शरीरावर गोंदवलेत असंख्य टॅटूज, खर्च केले आहेत इतके पैसे

शरीरावर टॅटूज गोंदवणं एखाद्याला आवडू शकतं. पण इतकं?

    लंडन, 21 मार्च : 'आली लहर आणि केला कहर' ही म्हण तुम्हाला माहीत असेल. एका महिलेचा किस्सा ऐकून तुम्ही हेच म्हणाल. हौसेपोटी या महिलेनं जे काही केलं ते अतिशय विचित्र वाटेल. पण ते खरं आहे. (London news) इंग्लंडमध्ये राहणारी एक महिला सध्या चर्चेत आली आहे. ही महिला इंग्लंडच्या हीथफिल्ड या भागात राहते. या महिलेचं नाव आहे बेथनी मूर. बेथनीनं काय केलं असेल? तर तिनं आपल्या पूर्ण शरीरावर टॅटू बनवून घेतले आहेत. आता जगभरातील माध्यमांमध्ये बेथनीच्या बातम्या झळकत आहेत. (woman tattooed whole body) एका वृत्तानुसार, बेथनीच्या शरीरावर हरेक इंचावर टॅटू बनलेला आहे. ही खास हौस पूर्ण करण्यासाठी बेथनीनं आजवर लाखो रुपये खर्च केले आहेत. पण तिचा हा आगळाच शौक लोकांना काही आवडला नाही. तिला आता अनेकजण खूप टोमणे मारत आहेत. मात्र तरीही बेथनीचं म्हणणं आहे, की ती शरीरावर जितके जास्त टॅटू बनवते तितकाच तिचा कॉन्फिडन्स वाढत जातो. (woman spent lakhs for tattooing body) हेही वाचा चोरी करण्याचा प्रयत्न आला अंगलट, शेवटी पोलिसांचीच घ्यावी लागली मदत बेथनीनं आपल्या शरीरावर सर्वात पहिला टॅटू वयाच्या 18व्या वर्षी बनवला होता. आता ती 26 वर्षांची आहे. तिच्या शरीराच्या हरेक भागावर आता टॅटू आहे. सोबतच तिनं आपल्या शरीरात 15 जागांवर पिअर्सिंग केलं आहे. सगळ्या शरीरावर गोंदण्यास एकूण 20 लाख खर्च केले आहेत. अनेकांनी ट्रोल केल्यावरही बेथनी म्हणते की तिला या गोष्टींमुळं काहीच फरक पडत नाही. (Bethany Moore faces criticism as tattoos whole body) हेही वाचा लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर...; हर्ष गोएंका यांचा VIDEO होतोय व्हायरल आता बेथनीचं सगळं शरीर टॅटूजनी रंगलं आहे. केवळ चेहरा यातून मागं ठेवलेला आहे. मात्र हे असं करणारी केवळ बेथनी नाही. याआधीही अनेक लोकांनी ही कामगिरी केली आहे. अर्थात, आपल्या या अशा हौशीमुळं लोकांना अडचणीही आल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Hobby, London

    पुढील बातम्या