बंगळुरू, 12 एप्रिल : प्रत्येक विक्रेत्याची आपली वस्तू विकण्याची हटके स्टाइल असते. अनोख्या पद्धतीने आपल्या वस्तूंची विक्री करणारे विक्रेते सोशल मीडियावर व्हायरल होऊन प्रसिद्धही झाले. पण सध्या अशा एका महिला फळ विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो, आहे, जी तिच्या विक्रीच्या स्टाईलसाठी नव्हे तर वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. फळ विकण्यासह या महिलेनं असं काही काम केलं आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कर्नाटकातील ही फळ विक्रेता महिला आहे. जी अंकोला बसस्थानकावर फळं विकते. गाड्यांमध्ये असलेल्या प्रवाशांना ती फळं देते. आपल्या ग्राहकांना फळं दिल्यानंतर ती एक काम न विसरता करते. तिचं हेच काम कॅमेऱ्यात कैद झालं आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण थक्क झाले आहेत. किंबहुना अनेकांनी महिलेचं असं काम पाहून हातही जोडले आहेत.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता बसस्थानकावर एक बस उभी आहे. या बसबाहेर खाली एक महिला दिसते आहेत. जी रस्त्यावर काहीतरी उचलताना दिसते आहे. रस्त्यावर पडलेलं काहीतरी जमा करून ती शेवटी एका कचऱ्याच्या पेटीजवळ येते आणि त्यात ते टाकते. ही महिला फळ विक्रेती आहे. जी रस्त्यावर पडलेली पानं गोळा करते आहे. ओ तेरी! 500 रुपयांची नोट भरून बनवला पराठा; तव्यावरून उतरताच ‘चमत्कार’ झाला तुम्ही पाहिलं असेल बरेच फळविक्रेते झाडांच्या पानांमध्ये फळं विकताना दिसतात. ही महिला अशाच पानांमधून फळं विकते. गाडीमध्ये असलेले प्रवाशी फळं खाऊन झाल्यानंतर ही पानं गाडीबाहेर रस्त्यावर फेकतात. त्यावेळी ही महिला ती पाने गोळा करते आणि कचऱ्यात टाकते. @adarshahgd ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात रस्त्यावरील पानं उचलून त्यांची विल्हेवाट लावणे हा या महिलेच्या कामाचा भाग नाही. पण तरी ती असं करून स्वच्छ भारत अभियानात आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे, असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. अद्भुत! भारतातील ‘या’ गावात आहे आंब्याचं चालणारं झाड; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO सामान्यपणे सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करणारे कर्मचारी असतात. त्यामुळे बऱ्याचदा कित्येक लोक सर्रासपणे रस्त्यावर कचरा टाकतात. हे आपलं काम नाही साफसफाई करणाऱ्याचं आहे, ते आहेत ना ते साफ करतील, अशी मानसिकता असते. पण अशी मानसिकता या महिलेची नाही.
This lady is fruit seller & she sells fruits wrapped in leaves at Ankola Bus stand,Karnataka. Some people after finish eating they throw the leaves from bus window. But this lady goes there picks up the leaves and puts it in dustbin. Its not her work but she's doing it. 🙂🙏👍 pic.twitter.com/TaqQUGZuxP
— Adarsh Hegde (@adarshahgd) April 10, 2023
तसं तिचं काम फक्त फळं विकणं पण आपण ज्या पानांमधून फळं विकली त्या पानांचा रस्त्यावर कचरा होतो, हे तिच्या लक्षात आलं आहे, तिला आपल्या हक्कासह जबाबदारीची जाणीव आहे. जी तिच्या या कृतीतून स्पष्टपणे दिसून येते.