नवी दिल्ली, 29 जुलै : सामान्यपणे चपाती करायची म्हटलं की आपण गव्हाचं पीठ दळून आणतो किंवा गव्हाचं रेडीमेड पीठ आणतो. त्यानंतर त्यात पाणी-मीठ टाकून तेल लावून ते मळतो. यानंतर मळलेलं पीठ लाटून त्याच्या चपाती बनवून त्या तव्यावर किंवा गॅसवर शेकवल्या जातात. काही लोक या चपातीला तेल किंवा तूप लावतात आणि गरमागरम कुटुंबाला खायला देता. पण थांबा ही चपाती तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित आहे का? किचन जुगाड चा हा व्हिडीओ आहे. चपाती कुटुंबासाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न आम्ही का विचारत आहात, असं तुम्ही म्हणाल. कारण ती तुम्हीच बनवली आहे त्यामुळे ती खाल्ल्याने कुटुंबाला त्यापासून धोका नाही. पण तरी तुम्ही बनवलेली चपातीही तुमच्या कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकते. आता ते का आणि हे ओळखायचं कसं? ते पाहुयात. Kitchen Jugaad - बटाटा कमी करेल तुमचं लाइट बिल; कसं ते पाहा VIDEO गॅसवर तवा गरम करून त्यावर गव्हाचं पीठ टाका आणि गॅस चालू असतानाच चमच्याने हलवून घ्या. लगेच हे पीठ भाजलं जात असेल, करपत असेल तर यात भेसळ आहे समजा यात हलक्या दर्जाचा मैद्याची भेसळ असू शकते. गव्हाचं पीठ पटकन करपत नाही. जर पीठ भाजायला वेळ जात असेल तर ते शुद्ध गव्हाचं पीठ आहेत. त्यात भेसळ नाही हे समजा. आता दुसरी पद्धत पाहुयात. सामान्यपणे आपण चपाती करताना पीठ चाळून घ्या. पीठ चाळल्यावर सामान्यपणे गव्हाचा वरच्या भागाचा कोंडा चाळणीत राहतो. पण जर चाळणीत असं काहीच राहत नसेल तर त्या पीठात भेसळ आहे हे समजा. कोणत्याही पदार्थात भेसळ असेल तर ते आरोग्यासाठी चांगलं नाही. यामुळे तुम्ही सुरक्षित नाही. पण अशी खात्री करून घेतली तर तुम्हाला भेसळ ओळखता येईल आणि तुम्ही भेसळयुक्त पदार्थ खाणं टाळून तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकता. Kitchen Jugaad - अशावेळी दुधावर न्यूजपेपर नक्की ठेवा; काय कमाल होते एकदा पाहाच हा VIDEO
पुणेरी तडका युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
तुम्ही असे कोणते जुगाड करता त्याबाबतही आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये माहिती नक्की द्या.
(सूचना - हा लेख व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमतचा याच्याशी संबंध नाही. न्यूज 18 लोकमत याचं समर्थन करत नाही किंवा याची हमी देत नाही.)