नवी दिल्ली, 2 जानेवारी : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक डान्स व्हिडीओ असलेले पहायला मिळतात. निरनिराळ्या पद्धतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधत असतात. डान्स म्हटल्यावर लोक आवर्जुन असे व्हिडीओ पाहण्यास पसंत करतात. आत्तापर्यंत कोंबडी डान्स, नागिन डान्स, दारु डान्स असे अनेक हटके डान्स पाहिले. मात्र आता खटिया डान्स समोर आला असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर अनेक हटके डान्स व्हायरल होत असतात. अशातच आता आणखी एका हटके डान्सची भर पडली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, पाच जणांनी सेम रंगाचे कपडे घातले आहेत. त्यांच्यामद्ये एक खाट ठेवली असून एक जण त्यावर बसला आहे. पाचही जण जोरदार डान्स करत असून सध्या हा खटिया डान्स सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
View this post on Instagram
Classy Peeps Of Pakistan या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरभरुन कमेंट येताना दिसत आहे. अनेकजण व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओला आत्तापर्यंत लाखोंवर लाइक्स मिळाले आहेत. या हटके डान्सची चर्चा सोशल मीडियावर रंगलेली पहायला मिळत आहे. अनेकांनी म्हटलं नागिन डान्सला टक्कर देणारा डान्स आहे, पलंग तोड डान्स, मी माझ्या क्रशला इम्प्रेस करण्यासाठी हा डान्स करायला तयार आहे, अनेक जणांनी आपल्या मित्रांना टॅग करत लग्नात असा डान्स करण्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, अनेक मजेशीर, हटके आणि विचित्र डान्स सोशल मीडियावर सर्रास पहायला मिळतात. नेटकऱ्यांन्याही असं काहीतरी मजेशीर पहायला नेहमीच आवडतं. त्यामुळे असे व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. यापूर्वीही अनेक हटके डान्सचे व्हिडीओ समोर आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Social media viral, Video viral, Viral, Viral news