मराठी बातम्या /बातम्या /Viral /सूर्यमालेतल्या सर्वांत शक्तिशाली वादळाचा आकार घटतोय? हबल स्पेसने टिपले गुरू ग्रहावरचे बदल

सूर्यमालेतल्या सर्वांत शक्तिशाली वादळाचा आकार घटतोय? हबल स्पेसने टिपले गुरू ग्रहावरचे बदल

habal space

habal space

फ्लाइंग ऑब्झर्व्हेटरी असलेल्या हबलने गुरू ग्रहावरच्या उत्तर अक्षांशांवर वादळी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 25 मार्च : ज्याप्रमाणे पृथ्वीच्या पोटात जगाच्या निर्मितीची अनेक रहस्यं दडलेली आहेत, त्याचप्रमाणे आपल्या डोक्यावरच्या अवकाशामध्येही अनेक गुपितं दडलेली आहेत. अंतराळ संशोधक विविध शक्तिशाली दुर्बिणींच्या मदतीने अवकाशातली ही गुपितं शोधून काढण्याचं काम करत असतात. या प्रक्रियेदरम्यान कधी-कधी काही अद्भुत गोष्टी त्यांच्या नजरेस पडतात. आताही हबल स्पेस टेलिस्कोप या शक्तिशाली दुर्बिणीने गुरू ग्रहाबद्दल महत्त्वाची माहिती टिपली आहे. हबलने आपल्या समकक्ष जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या बरोबरीने उत्तम कामगिरी केली आहे. हबलने आपल्या सूर्यमालेतल्या गुरू ग्रहावरचं सतत बदलणारं वातावरण टिपलं आहे.

  फ्लाइंग ऑब्झर्व्हेटरी असलेल्या हबलने गुरू ग्रहावरच्या उत्तर अक्षांशांवर वादळी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. ग्रहावर भोवरा बनवणाऱ्या बदलत राहणाऱ्या वादळांची स्ट्रिंग हबलच्या निदर्शनास आली आहे. याशिवाय, गुरू ग्रहावरच्या 'ग्रेट रेड स्पॉट'चा आकारही हळूहळू घटत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

  गुरू ग्रहावर दिसलेला भोवरा हा नेस्टेड सायक्लोन आणि अँटीसायक्लोनचा लहरींचा नमुना आहे. जो घड्याळाच्या दिशेनं आणि घड्याळाच्या उलट दिशेने फिरणाऱ्या यंत्राच्या गीअर्सप्रमाणे एकत्र लॉक केलेला असतो. नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने सांगितलं की, ही वादळं एकमेकांच्या पुरेशी जवळ आली आणि एकत्र विलीन झाली तर त्यातून आणखी मोठं वादळ तयार होऊ शकतं. या वादळाचा आकार ग्रेट रेड स्पॉटच्या सध्याच्या आकाराएवढा असू शकतो.

  दरम्यान, ग्रेट रेड स्पॉट हे आपल्या सूर्यमालेतले सर्वांत शक्तिशाली वादळ आहे. 150 वर्षांपूर्वीच्या निरीक्षण नोंदीनुसार आता त्याच्या आकारात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हे वादळ सध्या आपल्या आतापर्यंतच्या सर्वांत लहान आकारात आहे.

  ग्रेट रेड स्पॉट हा आपल्या सूर्यमालेतल्या वादळांचा राजा आहे. जुनो अंतराळयानाच्या उड्डाणानं शास्त्रज्ञांना हे निर्धारित करण्यात मदत केली की, या वादळाची मुळं गुरू ग्रहाच्या वातावरणात किमान 320 किलोमीटर अंतरावर पसरलेली आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, पृथ्वीवरचं एक सामान्य उष्णकटिबंधीय चक्रीवादळ फक्त 15 किलोमीटरपर्यंत पसरते. यावरून ग्रेट रेड स्पॉटच्या अवाढव्यतेची कल्पना करता येऊ शकते. खगोलशास्त्रज्ञांच्या नोंदीनुसार, या वादळाचा आकार कमी होत आहे आणि एका शतकापेक्षा जास्त कालावधीच्या निरीक्षणांनुसार त्याचा अंडाकृती आकार आता अधिक गोलाकार होत आहे.

  हबलने टिपलेल्या केलेल्या प्रतिमांमध्ये गुरूचा बर्फाळ चंद्र 'गॅनिमेड' हा ग्रहावरून जात असल्याचं दिसत आहे. दुर्बिणीने टिपलेल्या छायाचित्रात गुरू ग्रहाच्या बहुरंगी ढगांच्या वर गुरूचा केशरी रंगाचा चंद्र (उपग्रह) दिसत असून, त्याची सावली गुरूच्या पश्चिमेकडच्या भागावर पडलेली दिसत आहे.

  युरोपियन स्पेस एजन्सीने (ईएसए) म्हटलं आहे की, गुरूच्या हवामानाची हालचाल आतून बाहेरच्या बाजूला आहे. कारण, सूर्यापासून जितकी उष्णता मिळते त्यापेक्षा जास्त उष्णता त्याच्या आतल्या भागात झिरपते. ही उष्णता अप्रत्यक्षपणे ढगांमध्ये रंग-परिवर्तन चक्र चालवते. सध्या ती चक्रीवादळ आणि अँटीसायक्लोन्सची प्रणाली हायलाइट करत आहे.

  First published:
  top videos

   Tags: Space Centre