मराठी बातम्या /बातम्या /Viral /जपानमधल्या 'जोहात्सू' विषयी माहिती आहे का? अचानक गायब होतात माणसं...!

जपानमधल्या 'जोहात्सू' विषयी माहिती आहे का? अचानक गायब होतात माणसं...!

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

जपानमध्ये हळूहळू गायब होऊ लागले लोक, रहस्य समोर येताच सगळ्यांना बसला धक्का

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई 29 जानेवारी : गेल्या काही वर्षांत धावपळीची जीवनशैली आणि ताणतणावामुळे शारीरिक, तसंच मानसिक समस्या वाढल्या आहेत. प्रत्येक जण मनःशांती आणि आनंदाचे दोन क्षण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे; पण कामाचा ताण, कौटुंबिक, आर्थिक समस्यांसह विविध कारणांमुळे या प्रयत्नांना यश मिळतंच असं नाही. तणावात असलेल्या आणि मनःशांती मिळत नसलेल्या व्यक्तीच्या मनात कधी तरी असा विचार येतो, की सगळं सोडून निघून जावं.

    काही व्यक्ती अशा वेळी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात; पण जपानी व्यक्ती असं न करता, एक वेगळा मार्ग निवडतात. त्या मार्गाला जपानमध्ये जोहात्सू असं म्हटलं जात. जोहात्सूचा अर्थ वाफ होऊन उडून जाणं. यानुसार त्रस्त व्यक्ती अचानक गायब होते आणि दूर कुठे तरी जाऊन नवं आयुष्य सुरू करते. हा प्रकार नेमका काय आहे, ते जाणून घेऊ या.

    जीवनाला वैतागलेल्या व्यक्ती बऱ्याचदा जिथे आपल्याला कोणीच ओळखत नाही, अशा ठिकाणी जाऊन नवं आयुष्य सुरू करण्याचा विचार करत असतात. हा विचार प्रत्यक्षात येऊ शकतो. जपानमध्ये याला जोहात्सू असं म्हणतात. जोहात्स म्हणजे वाफ बनून उडून जाणं.

    जपानी व्यक्ती कौटुंबिक ताण किंवा नोकरीला कंटाळून अचानक गायब होतात आणि एक नवं आयुष्य सुरू करतात. विशेष म्हणजे यासाठी काही कंपन्या मदत करतात. त्यांना फी म्हणून मोठी रक्कम दिली जाते. काही जण रोजच्यासारखं नोकरीसाठी घरातून बाहेर पडले आणि घरी कधीच परतले नाहीत, अशीही प्रकरणं जपानमध्ये पाहायला मिळतात. अशा गायब झालेल्यांना जपानमध्ये जोहात्सू असं म्हणतात.

    घरातल्या सदस्यांनी खूप शोध घेऊनही त्यांचा कोणताही सुगावा लागत नाही, असं बऱ्याच प्रकरणांमध्ये दिसतं. या व्यक्तींच्या अशा पद्धतीने अचानक गायब होण्यामागे, कुटुंब, नोकरीतले तणाव किंवा जास्त कर्ज ही कारणं असतात. ज्या व्यक्ती गायब अर्थात जोहात्सू होण्याचा निर्णय घेतात, त्यांना यासाठी कंपन्या मदत करतात.

    या कामाला नाइट मूव्हिंग सर्व्हिस म्हटलं जातं. या कंपन्या अशा व्यक्तींना एक नवं आयुष्य सुरू करण्यास मदत करतात. एखाद्या गुप्त ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते.

    हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, की जपानमध्ये जोहात्सूमुळे घटस्फोटाचं प्रमाण कमी आहे. घटस्फोटासाठी कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यापेक्षा गायब होणं जपानी नागरिकांना अधिक सोयीस्कर वाटतं. `जपानमध्ये गायब होणं खूप सोपं आहे.

    देशात त्या गोपनीयतेबाबतचे कायदे अतिशय कडक आहेत, हेदेखील यामागचं महत्त्वाचं कारण आहे. गुन्हा किंवा अपघात झाल्याचा संशय येत नाही, तोपर्यंत पोलीस हरवलेल्या व्यक्तीला शोधत नाहीत. अशा परिस्थितीत हरवलेली व्यक्ती एटीएममधून पैसे काढते. पोलिसांच्या मदतीऐवजी बेपत्ता व्यक्तीचे कुटुंबीय खासगी गुप्तहेरांची मदत घेतात,` असं जोहात्सूवर गेल्या काही वर्षांपासून संशोधन करणारे समाजशास्त्रज्ञ हिरोकी नाकामोरिक यांनी सांगितलं.

    `बीबीसी`च्या अहवालानुसार, 1990च्या दशकात नाइट मूव्हिंग कंपनी सुरू करणाऱ्या शो हतोरी यांच्या म्हणण्यानुसार, `बेपत्ता होण्यामागे कायम नकारात्मक कारणच असतं असं नाही. काही जण नव्या नोकरीसाठी किंवा नव्याने विवाह करण्यासाठी जोहात्सूचा पर्याय निवडतात. पूर्वी काही जण आर्थिक समस्येमुळे बेपत्ता होत; पण आता सामाजिक कारणांमुळेदेखील हे पाऊल उचललं जातं.`

    `जोहात्सू हा शब्द पहिल्यांदा 1960च्या दशकात गायब झालेल्या व्यक्तींसाठी वापरला गेला,` असं नाकामोरिक यांनी सांगितलं.

    नाइट मूव्हिंग कंपनी चालवणारी एक महिला गेल्या 17 वर्षांपासून बेपत्ता आहे. ती कौटुंबिक हिंसाचारामुळे त्रस्त होती. त्यानंतर ती गायब झाली. आता ती दुसऱ्या व्यक्तींना बेपत्ता होण्यासाठी मदत करते. ती असं करण्याचं कारणदेखील कोणाला विचारत नाही. 'मी व्यवसायानिमित्त ट्रिपला चाललोय,' असं एका व्यक्तीनं त्याची पत्नी आणि मुलांना सांगितलं; पण खरं तर तो जोहात्सूसाठी बाहेर पडला होता. 'कुटुंबापासून दुरावल्याचं मला दुःख आहे; पण मी परत त्यांच्याकडे जाऊ इच्छित नाही,' असं त्याचं म्हणणं आहे.

    First published:

    Tags: Japan, Shocking, Social media, Top trending, Viral, Viral news