मराठी बातम्या /बातम्या /Viral /जॉबलेस ज्युसवाला! मित्रांनी मिळून सुरु केला नवा व्यवसाय, नावामागे दडलीय खास कहाणी

जॉबलेस ज्युसवाला! मित्रांनी मिळून सुरु केला नवा व्यवसाय, नावामागे दडलीय खास कहाणी

व्हायरल

व्हायरल

उन्हाची चाहूल लागताच रेल्वे स्थानक, बसस्थानक, रस्ता अशा विविध ठिकाणी ज्युस विक्रेते दिसू लागलेत. काहीजणांनी उसाच्या रसाचा स्टॉल लावलाय, तर काहीजणांनी लिंबू सरबत विक्रीसाठी हातगाडी लावलीय.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली, 28 मार्च : उन्हाची चाहूल लागताच रेल्वे स्थानक, बसस्थानक, रस्ता अशा विविध ठिकाणी ज्युस विक्रेते दिसू लागलेत. काहीजणांनी उसाच्या रसाचा स्टॉल लावलाय, तर काहीजणांनी लिंबू सरबत विक्रीसाठी हातगाडी लावलीय. रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल्सवर विविध प्रकारची शीतपेयं विकली जात असल्यानं ग्राहकांचीदेखील उन्हाळ्यात या स्टॉलवर शीतपेय पिण्यास पसंती असते. याला पश्चिम बंगाल मधील वर्धमान शहरही अपवाद नाही. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात वर्धमान शहरातील एका ज्युसच्या दुकानानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. कारण या दुकानाचं नाव आहे 'जॉबलेस ज्युसवाला'!

    'जॉबलेस ज्युसवाला' सध्या केवळ वर्धमान शहरातीलच नाही, तर शहरामध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या दुसऱ्या गावातील लोकांचेही लक्ष वेधून घेतोय. दुकानाचं भन्नाट नाव पाहून अनेकजण कुतूहल म्हणून इथे ज्युस पिण्यासाठी येतात. या दुकानात ‘मोजीटोस’, ‘मसाला सोडा’, ‘मसाला कोल्ड्रिंक्स’, ‘मँगो ज्युस’ आदी विविध प्रकारचे ज्युस उपलब्ध आहेत. मोजिटोची किंमत 40 रुपये, तर आंब्याचा ज्युस आणि मसाला सोडाची किंमत 30 रुपये आहे. हे दुकान आठवड्यातून 7 दिवस सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असते. वर्धमान पोलीस लाईनजवळील घोरदौरचट्टी येथे असणारं हे दुकान अल्पावधीतच खूप लोकप्रिय झालंय.

    हेही वाचा -  ब्रेकअप पत्र! मला कळवण्यास खेद वाटतो की....; तरुणाने प्रेयसीला लिहिलेलं शेवटचं लेटर व्हायरल

    म्हणून दुकानाचं नाव ‘जॉबलेस ज्युसवाला’

    या दुकानाचं नाव ‘जॉबलेस ज्युसवाला’ असं का असेल, असा प्रश्न अनेकांना पडतोय. मात्र, दुकानाला असं नाव का दिलं, या मागील कारण दुकानाचे मालक असणाऱ्या अभिजित गुहा आणि अपू सरकार यांनी सांगितलं. अभिजित व अपू या दोन्ही मित्रांनी मिळून हे ज्युसचं दुकान उघडलं. त्यांनी सांगितलं की, ‘14 वर्षे आम्ही दोघांनीही खासगी कंपनीमध्ये प्रामाणिकपणे काम केलं. मात्र महिनाभरापूर्वी आमच्या कंपनीनं अचानक नोकरकपात सुरू केली, व आमच्या दोघांचीही नोकरी गेली. त्यानंतर नवीन नोकरी न शोधता आम्ही हा ज्युसचा व्यवसाय सुरू केलाय. नोकरी गेल्यानंतर हा व्यवसाय सुरू केल्यानं दुकानाला 'जॉबलेस ज्युसवाला' असे नाव दिलं आहे.’

    सध्या या ज्युस दुकानाच्या उत्पन्नातून या दोन्ही मित्रांचा संसार चालतो. अभिजित आणि अपू या दोन्ही मित्रांना हे ज्युसचे दुकान भविष्यात आणखी मोठं करायचं आहे. या बाबत अपू म्हणाले, ‘मंदीमुळे अनेक कंपन्यांनी नोकरकपात सुरू केलीय. आमच्या दोघांना कंपनीनं नवीन नोकरी शोधण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही नोकरी शोधण्याऐवजी हा व्यवसाय सुरू केलाय. कारण नोकरीसाठी दुसरी कंपनी शोधली, तरी ती आम्हाला नोकरीवरून कधी काढून टाकेल, हे सांगता येत नाही.’ तर, अभिजित यांनी सांगितलं, ‘ दुकानाला असं नाव देण्यामागील आमचा मुख्य उद्देश चांगला प्रतिसाद मिळणं व व्यवसाय वाढवणं हा आहे. व्हायरल होणं हा आमचा मुख्य उद्देश नाही.’

    दरम्यान, सध्या या दुकानाला असलेलं नाव खूपच चर्चेत आहे. ग्राहकांची येथे गर्दी वाढली आहे.

    First published:
    top videos