गढवा, 27 ऑगस्ट: कोरोना काळात आजही अनेक गावांमध्ये बस आणि सायकल रिक्षा चालू नाहीत किंवा अनेक ठिकाणी खिशात केवळ पैसे नाहीत म्हणून मजुरांचे हाल होत असल्याच्या घटना समोर येत आहे. एकीकडे मुलाला बस बंद असल्यानं परीक्षेला 85 किमी सायकलवरून घेऊन जाताना दिसले होते. त्यानंतर आता 60 वर्षांच्या व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. आपल्या आईला पाठिवर बसवून तब्बल 4 किलोमीटर दूर असलेल्या बँकेत पोहोचला. द हिंदूनं दिलेल्या वृत्तानुसार गढवा जिल्ह्यातील रांका इथे ग्रामीण बँकेबाहेर कोरोना टेस्टचा कॅम्प लावण्यात आला होता. तिथे कोरोना टेस्ट न केल्यामुळे या माय-लेकांना बँकेमध्ये आता प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं. हे वाचा- “हा क्लॉस्ट्रोफोबिया आहे?”, अंकिताने VIDEO शेअर करत खोडून काढला रियाचा दावा 60 वर्षीय बिफन भुयान यांनी आपल्या आईला आणि मला बँक अधिकाऱ्यांनी रोखल्याचा दावा केला. गावापासून दूर 4 किमी 105 वर्षांच्या आईला पाठीवर बसवून घेऊन बँकेत आल्यानंतर अधिकाऱ्यांनी मात्र हाकलून दिल्याचा आरोप त्यांनी केला. माझ्या आईच्या खात्यावर जनधन योजनेंतर्गत तीन महिन्याचं 1500 रुपये पेन्शन आल्याची माहिती मिळाली होती. हे पेन्शन घेण्यासाठी मी आईला पाठीवर बसवून इतक्या दूर चालत आलो मात्र आम्ही कोरोना कॅम्पमध्ये आईची टेस्ट करून न घेतल्यानं आम्हाला बँकेत येण्यासाठी मज्जाव केला अशी माहिती 60 वर्षीय बिफन भुयान यांनी दिली आहे. या व्यक्तीच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर झाडखंडच्या मुख्यमंत्र्यांनी गढवाच्या उपायुक्तांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. ही घटना झारखंड इथल्या गढवा परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.