मराठी बातम्या /बातम्या /Viral /कधी विचार केलाय? सिंह खरंच जंगलाचा राजा आहे का? जाणून घ्या संशोधकांचं नक्की काय आहे म्हणणं

कधी विचार केलाय? सिंह खरंच जंगलाचा राजा आहे का? जाणून घ्या संशोधकांचं नक्की काय आहे म्हणणं

जगातले सर्वांत जास्त सिंह आफ्रिकेत आहेत.

जगातले सर्वांत जास्त सिंह आफ्रिकेत आहेत.

सिंह हा राजा आहे, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पूर्ण सिद्ध होत नाही. सिंहिणीचं प्रमुख काम शिकार करणं हे आहे

    मुंबई, 26 जानेवारी:  सिंह हा जंगलाचा राजा (King of jungle) आहे, असं बालपणापासूनच आपण सर्व जण ऐकत आलो आहोत; मात्र हे खरं नाहीये असं तज्ज्ञ सांगतात. सिंहाला जरी जंगलाचा राजा म्हटलं जात असलं, तरी तो जंगलात राहत नाही. याची अनेक कारणंदेखील सांगण्यात आली आहेत. सिहांमध्ये त्यांना राजा म्हटलं जावं किंवा त्यांना कोणतेही पद (छोटं किंवा मोठं) दिलं जावं, अशी कोणतीही व्यवस्था नाही. आणखी अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं, तर सिंहांच्या प्रजातीमध्ये कोणतीच रँकिंग व्यवस्था (Ranking System) नाही. त्यांच्या जगात प्रत्येकाला समानतेने जगण्याचा अधिकार आहे, असं बीबीसी अर्थच्या विशेष अहवालात म्हटलं आहे. (BBC Report on Lion) त्या अहवालाच्या हवाल्याने 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतची माहिती प्रकाशित केली आहे.

    सिंहिणीला जंगलाची राणी म्हटलं गेलं पाहिजे, असं सिंहावर संशोधन करणारे म्हणतात. (Research on Lion) त्याला ते असं कारण देतात, की त्यांच्यावर जबाबदारी जास्त असते. या जबाबदाऱ्या सिंहिणी तितक्याच समर्थपणे निभावतात. तसंच वाघांच्या तुलनेत सिंह समूहात राहणं पसंत करतात. यात सिंहिणींचा समावेश जास्त असतो. त्यांचा समूह 3 ते 40 जणांचा असतो. समूहात सरासरी 13 प्रौढ सिंह असतात आणि माद्यांची संख्या जास्त असते. ते फारच सामाजिक प्राणी असतात.

    आश्चर्य! 9 महिने नव्हे तर 2000 वर्षे आईच्या पोटात होतं बाळ; बाहेर काढताच...

    जगातले सर्वांत जास्त सिंह आफ्रिकेत आहेत. सेंट्रल आफ्रिकन रिपब्‍लिक, साउथ सुदान आणि भारतातही सिंह आढळतात. (Lion in India) आफ्रिकेत अंगोला, बोट्सवाना, टांझानिया या देशांमध्ये सर्वाधिक सिंह आहेत. (Lions in Africa) सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं; मात्र त्याला जंगलात राहणं आवडत नाही. तो पर्वत, गवताळ मैदानं आणि झाडाझुडपांमध्ये राहणं पसंत करतो, असं एका अहवालात म्हटलं आहे.

    सिंह हा राजा आहे, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पूर्ण सिद्ध होत नाही. सिंहिणीचं प्रमुख काम शिकार करणं हे आहे, असं संशोधनात सिद्ध झालं आहे. तसंच शिकार करण्याची क्षमता सिंह आणि सिंहीण दोघांमध्ये सारखी असते. दोघंही समान आहेत. कोणी छोटं किंवा मोठं नाही, असं वृत्तात स्पष्ट झालं आहे.

    सिंहीण समूहासोबत शिकार करते. तिला अनेक जबाबदाऱ्या असतात. ती नर आणि तिच्या मुलांना शिकार उपलब्ध करून देते. सिंहाचं मुख्य काम आपल्या समूहाचं रक्षण करणं हे आहे. आपल्या मुलांना सांभाळण्यासोबत त्यांच्या जिवाचं रक्षण करण्याची जबाबदारीही सिंहिणीवर असते, असंही त्यात म्हटलं आहे.

    First published:

    Tags: Daily news, R gujarat lion, Research, Viral