नवी दिल्ली, 20 मार्च : लष्कराचे जवान देशासाठी, देशातील लोकांच्या मदतीसाठी कायमच तत्पर असलेले पहायला मिळतात. कोणतंही संकट ओढावलं तरी ते शक्य त्या ठिकाणी जाऊन मदत करताना दिसतात. त्यामुळे देशातील नागरिकांना कायमच त्यांचा अभिमान वाटतो. जवानांनी केलेल्या मदतीचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आणखी एक व्हिडीओ समोर आला असून पुन्हा एकदा जवानांचं मोठं मन पहायला मिळालं.
लष्कराच्या दोन जवानांनी मध्यरात्री संकटात सापडलेल्या कुटुंबाला मदत करून सर्वांची मने जिंकली. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, मध्यरात्री एक कुटुंब मोकल्या रस्त्यावर उभे आहे, ज्यांची दुचाकी खराब झाली आहे. ते मदत घेण्याचा विचार केला तरी आजपास कोणीच नाहीये. तेवढ्यात दुचाकीवरून दोन लष्करी जवान तेथे येऊन थांबतात. त्यानंतर तो खराब झालेली बाईक स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण बाईक सुरू होत नाही. अशा परिस्थितीत जवान मदत करत आपली दुचाकी त्या कुटुंबाला देतात. जवान आपला नंबर त्यांना देतात जेणेकरुन गाडी ठिक झाल्यावर योग्या त्या पत्त्यावर पाठवता येईल.
The Men In Uniform…Salutes And Respect To The Real Heroes Of The Nation…🙏🏾🙏🏾🙏🏾 Jai Hind pic.twitter.com/b9UwLZQNLk
— Hasna Zaroori Hai 🇮🇳 (@HasnaZarooriHai) March 18, 2023
हा हृदयस्पर्शी व्हिडिओ @HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर आयडीवर शेअर करण्यात आला आहे आणि 'राष्ट्राच्या खऱ्या वीरांना सलाम आणि आदर' असे कॅप्शन लिहिले आहे. दोन मिनिटे 20 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 40 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ अगदी काही वेळात इंटरनेटवर धुमाकूळ घालताना पहायला मिळाला.
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकरी आनंदी झाले असून व्हिडीओवर भरभरुन कौतुकाचा वर्षाव करत आहेत. यापूर्वीही असे काही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Inspiration, Social media viral, Videos viral, Viral