अपंग असूनही कुबड्या घेऊन खेळतोय बास्केटबॉल, VIDEO पाहून तरुणाच्या जिद्दीला कराल सलाम!

अपंग असूनही कुबड्या घेऊन खेळतोय बास्केटबॉल, VIDEO पाहून तरुणाच्या जिद्दीला कराल सलाम!

हा तरुण खूप उत्तम आणि सफाईदारपणे गोल देखिल करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : एखादी छोटीशी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपण लगेच खचून जातो किंवा टोकाचं पाऊल उचलतो. बऱ्याचदा आय़ुष्यात अनेक वळणावर अवघड प्रसंग येतात तिथे आपण खूप खचून जातो. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

या आधी अपंग मुलीचा घागर भरून डोक्यावरून पाणी घेऊन जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अपंग असणारा तरुण कुबड्यांच्या मदतीनं बास्केटबॉल खेळत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा तरुण खूप उत्तम आणि सफाईदारपणे गोल देखिल करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट करताना म्हटलं आहे. 13 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 257 लोकांनी रिट्वीट केला आहे.

हौसला हो बुलंद, निश:ब्द आणि जिद्दीला सलाम या आणि अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स सोशल मीडियावर या व्हिडीओवर येत आहे. हा व्हिडीओ क्रीडा दिना निमित्तानं सुशांत नंदा या ट्वीट केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 31, 2020, 11:11 AM IST

ताज्या बातम्या