जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ट्रेनमध्ये काहीही खरेदी किंवा खात असाल तर हा VIDEO पाहा, पाहून येईल किळस

ट्रेनमध्ये काहीही खरेदी किंवा खात असाल तर हा VIDEO पाहा, पाहून येईल किळस

ट्रेनमध्ये काहीही खरेदी किंवा खात असाल तर हा VIDEO पाहा

ट्रेनमध्ये काहीही खरेदी किंवा खात असाल तर हा VIDEO पाहा

ट्रेनने अनेक लोक प्रवास करतात. लांबचा प्रवास करत असाल तर भूक हमखास लागते. यासाठी लोक सोबत खायला ठेवतात किंवा ट्रेनमध्ये विकायला येणाऱ्या खाद्यपदार्थांचा आनंद लुटतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली : ट्रेनने अनेक लोक प्रवास करतात. लांबचा प्रवास करत असाल तर भूक हमखास लागते. यासाठी लोक सोबत खायला ठेवतात किंवा ट्रेनमध्ये विकायला येणाऱ्या खाद्यपदार्थांचा आनंद लुटतात. मग तो चहा असो, वडापाव असो किंवा चाट. प्रवास सोपा आणि चविष्ट बनवण्यासाठी लोक मस्त खाद्यपदार्थ खातात. मात्र तुम्हाला माहितीय का ट्रेनमधील पदार्थ जेवढे चविष्ट असतात तेवढेच आरोग्यासाठी हानिकारक. आता तुम्ही म्हणत असाल ते कसे? यासाठी सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ एकदा बघाच. ट्रेनमध्ये तुम्ही जे पदार्थ खातात ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. खाताना तुम्हाला कदाचित ते चविष्ट लागतील मात्र नंतर याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. ते खाल्ल्याने तुम्हाला फूड पॉयझनिंग आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या होऊ शकतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये खाद्यपदार्थ बाथरूमजवळ ठेवले होते.

News18लोकमत
News18लोकमत

अनेकदा तुम्ही ट्रेनमध्ये चने विकणारे पाहिले असतील. एवढंच नव्हे तर ते घेऊन खाल्लेही असतील. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही परत ट्रेनमधील खाद्यपदार्थांकडे पाहणारही नाही. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चना विकणाऱ्या विक्रेत्याने ट्रेनच्या बाथरुममध्ये खाद्यपदार्थाची टोपली ठेवली आहे. आता बाथरुममध्ये ठेवलेले खाद्यपदार्थांवर किती जंतू बसले असतील याचा विचार करुनच उलटी येईल. आणि असे पदार्थ खाल्ल्यावर तर आरोग्याची धोका निर्माण होऊन अनेक आजार बळावतील.

जाहिरात

@tarun.srivastav नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अगदी काही वेळातच हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून लोक संताप व्यक्त करत आहे. व्हिडीओ भरपूर कमेंट येताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात