नवी दिल्ली, 22 मार्च : आजकाल फोटो आणि व्हिडीओ एडिटिंगचं क्रेझ वाढत चाललं आहे. सोशल मीडियावर अनेक निरनिराळे एडिट्स पहायला मिळतात. आपण विचारही करु शकत नाही असे-असे क्रिएटिव्ह एडिट्स लोक करतात. नेटकरीही अशा व्हिडीओंना भरपूर पसंती देतात. अशातच असेच काही क्रिएटिव्ह फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. सोशल मीडियावर गांधीजी, मदर तेरेसा आणि अल्बर्ट आइनस्टाईन यांसारख्या महान व्यक्तींचे बरेच फोटो व्हायरल होत असतात. मात्र सध्या समोर आलेला फोटो इतरांपेक्षा वेगळा असून फोटो पाहिल्यावर तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी चक्क गांधीजी, मदर तेरेसा आणि अल्बर्ट आइनस्टाईन यांसारख्या महान सेल्फी घेतानाचा फोटो पहायला मिळाला. आता त्या काळात मोबाईल फोन नव्हता ज्यातून सेल्फी घेता येईल, अशा परिस्थितीत ही छायाचित्रे तुम्हाला सांगतील की त्या काळात या सेलिब्रिटींनी सेल्फी काढला असता तर ते फोटोमध्ये कसे दिसले असते.
फोटोंमध्ये तुम्ही बघू शकता की गांधीजी कसे हसत सेल्फी घेत आहेत आणि त्यांच्या मागे काही महिला आणि पुरुषही उभे आहेत. याशिवाय दुसरा सेल्फी मदर तेरेसा यांचा आहे. हे चित्र पाहून तुम्हाला अजिबात वाटणार नाही की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बनवले आहे, कारण हे चित्र हुबेहुब खऱ्यासारखे दिसते. याशिवाय AI च्या मदतीने काही सेलिब्रिटींची छायाचित्रे तयार करण्यात आली आहेत, जी आश्चर्यकारक आहे.
दरम्यान, हे फोटो jyo_john_mulloor नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो अगदी काही वेळात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. व्हिडीओवर भरभरुन कमेंटही येताना दिसत आहेत.