जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अबब! तरुणाच्या डोक्यावर केसांऐवजी बर्फ; काय आहे हा प्रकार पाहा VIDEO

अबब! तरुणाच्या डोक्यावर केसांऐवजी बर्फ; काय आहे हा प्रकार पाहा VIDEO

तरुणाच्या डोक्यावर बर्फ

तरुणाच्या डोक्यावर बर्फ

डोक्यावर बर्फ असलेल्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 25 नोव्हेंबर : काही लोकांचे केस सरळ, काहींचे कुरळे असतात. काही जण केसांना रंग करून घेतात. याशिवाय बऱ्याच हेअरस्टाइल आणि हेअरकट तुम्ही पाहिले असतील. एकही केस नाही असं टक्कल पडलेलं डोकंही तुम्ही पाहिलं असेल. पण कधी डोक्यावर असा बर्फ तुम्ही पाहिला आहे का? डोक्यावर बर्फ असलेल्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हिवाळ्याच्या या थंडीत बर्फाचं नाव वाचून तुम्हाला हुडहुडी भरली असेल. पण हे महाशय मात्र आपल्या डोक्यावरच बर्फाचा डोंगर घेऊन फिरत आहेत आणि त्याची सेटिंग करण्यासाठी ते सलूनमध्येही पोहोचले. rjabhinavv इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘हेयरकट ऑन द रॉक्स…’  असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओवरही बर्फीला हेअरकट असं कॅप्शन दिलं आहे. हे वाचा -  असा Selfie नको रे बाबा! तरुणासोबत जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा; VIDEO VIRAL व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुण सलूनमध्ये आला आहे. तो खुर्चीत बसला आहे. पण त्याच्या डोक्यावर केस नाही तर चक्क बर्फ आहे. त्यानंतर सलूममधील एक व्यक्ती दिसते ती या तरुणाला विचारते की काय करायचं आहे आणि साइडने कट करायचं आहे का असं विचारते. त्यानंतर आपल्या सहकाऱ्याकडे ती व्यक्ती एक वस्तू मागते. सुरुवातीला त्या व्यक्तीला कात्री दिली जाते पण ती व्यक्ती कात्री नाही तर दुसरी वस्तू दे म्हणते आणि त्या व्यक्तीच्या हातात लाटणं येतं. त्यानंतर ही व्यक्ती त्या तरुणाच्या डोक्यावर लाटण्याने मारते आणि बर्फाचा एकएक तुकडा काढून आपल्या सहकाऱ्याच्या हातात देते. त्यावेळी ती व्यक्ती आपल्या सहकाऱ्याला हा तुकडा व्हिस्की, हा तुकडा कोकसाठी असंही सांगते. त्यानंतर ज्या व्यक्तीच्या डोक्यावरून हा बर्फ तोडून काढला त्या व्यक्तीला आठवड्यातून एकदा हेअरकट जरूर करून घ्या कारण आमच्याकडे बर्फ संपतो, असंही सांगते. व्हिडीओत जेव्हा ही व्यक्ती बर्फ तोडते तेव्हा ज्या व्यक्तीच्या डोक्यावर बर्फ आहे ती व्यक्ती मात्र दिसत नाही. हे वाचा -  हिवाळ्यात आंघोळ करण्याचं निंजा टेक्निक तुम्हाला माहिती आहे का? बघा व्हिडिओ हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने पुढील वेळेला यामध्ये थोडासा रूह अफजाही मिसळा म्हणजे लाल रंगही येईल, असं ससांगितलं आहे. एका य़ुझरने याला चालता-फिरता बर्फाचा गोळा म्हटलं आहे. तर काहींनी डोक्यावर बर्फ असलेल्या या तरुणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याच्या डोक्यातील रक्तप्रवाह नीट होतो आहे ना?, हा तरुण जिवंत कसा राहिला, असा विचारणाही काही युझर्सनी केल्या आहेत.

जाहिरात

तुमची या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात