लंडन, 19 डिसेंबर: आयुष्यभर आईस्क्रीम विकणाऱ्या (Ice cream seller) एका व्यक्तीचा मृत्यू (Death) झाल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी (Friends) ज्या प्रकारे त्यांची अंत्ययात्रा (Funeral) काढली, ते पाहून सगळेच भावूक (Emotional) झाले. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ही सर्वांसाठी फारच दुःखद घटना असते. मात्र त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला जमणारी गर्दी ही त्या व्यक्तीचा लोकसंग्रह दाखवणारी ठरते. त्या व्यक्तीवर प्रेम करणाऱे अनेकजण अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी करतात आणि त्याच्या आठवणी जागवतात. नुकताच झालेल्या आईस्क्रीम विकणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांचा कायम हा दुःखद तर होताच, मात्र तितकाच अनोखाही होता.
just witnessed an ice cream man’s funeral and all the ice cream vans came and followed in solidarity I AM SOBBING pic.twitter.com/bJhyJj4JoK
— Louisa Davies (@LouisaD__) December 17, 2021
ट्रक आले रस्त्यावर
ही घटना आहे लंडनमधील. 62 वर्षांच्या हसन डेरविस नावाच्या व्यक्तीचं निधन झालं. आयुष्यभर त्यानं आईस्क्रीम विकण्यात आपली हयात घालवली होती. त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील सर्व आईस्क्रीमचे ट्रक रस्त्यावर उतरले आणि या ट्रकचा ताफाच अंत्यसंस्कारांसाठी निघाला. सर्वात पुढं काळ्या रंगाची डेरविसचं शव असणारी गाडी आणि त्याच्यामागे हीssss लांबच्या लांब ट्रकची रांग, असं चित्र लंडनच्या रस्त्यावर पाहायला मिळालं.
I attended this funeral, I’m amazed how much of an impact it has had to the area pic.twitter.com/ci4HVAk2io
— Ismail Mehmet (@ismail_mehmet) December 17, 2021
नागरिक झाले भावूक
लुईसा डेविस नावाच्या महिलेनं तिच्या घराच्या गच्चीवरून ही अंत्ययात्रा पाहिली आणि आपल्या मोबाईलमध्ये त्याचं चित्रिकरण केलं. लांबून येणारे आणि कमी वेगाने चालणारे आईस्क्रीमचे ट्रक पाहून वातावरण भारावून गेलं होतं. एरवी आईस्क्रीम हा एक आनंदाचा भाग असतो. आईस्क्रीमचा ट्रक समोर आल्यावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूश होतात. मात्र यावेळी आपल्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देण्यासाठी चाललेले आईस्क्रीमचे ट्रक हे भावूक करणारे होते.
हे वाचा- Tiger Woods पेक्षा जास्त फॉलोअर्स असणारी Gold Player, लूक पाहून भडकतात लोक
अनेकांकडे व्हिडिओ
या अंत्ययात्रेला अनेकांनी हजेरी लावली. ज्यांनी ज्यांनी डेरविसकडून आईस्क्रीम घेतलं होतं, त्या सर्वाना त्याची आठवण येत होती. त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी सगळ्यांनी गर्दी केली होती. इस्माईल नावाच्या व्यक्तीचं वेगळ्या अँगलनं ही घटना रेकॉर्ड केली. आपण या अंत्ययात्रेत सहभागी झालो होतो, असं त्यानं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.