सध्याच्या काळात विवाहबाह्य संबंधांची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. आपला नवरा किंवा बायको दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते, ही गोष्ट मान्य करणं कोणत्याही विवाहित व्यक्तीसाठी फार कठीण ठरते. आपल्या जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर ती व्यक्ती संतापते आणि प्रसंगी आपल्या जोडीदाराची बदनामी करण्याचाही प्रयत्न करते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका धक्कादायक घटनेत एका पतीने पत्नीला आपली फसवणूक करताना रंगेहाथ पकडलं आणि तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमध्ये ती महिला एका मॉलमध्ये तिच्या कथित प्रियकराचा हात धरून फिरताना दिसत आहे. नवरा आपल्या स्मार्टफोनवर तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत राहिला आणि जेव्हा ती दोघं दुकानात खरेदीसाठी थांबली तेव्हा त्यांना जाब विचारला. ‘झी न्यूज’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जेव्हा पतीने पत्नीला समोरच जाब विचारला तेव्हा पत्नीने असा दावा केला, की तिच्यासोबतची व्यक्ती तिचा मित्र आहे; पण दोघं जण हातात हात घालून फिरतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, असं पतीने सांगितल्यानंतर पत्नी आक्रमक झाली. तिनं आपल्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडिओतल्या संभाषणातून असं लक्षात येतं की, या पती-पत्नीचे लग्नाअगोदर प्रेमसंबंध होते आणि लग्न करण्यासाठी ते घरातून पळून गेले होते.
Caught his #wife holding hands with someone in public.
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) July 21, 2023
Look how she started the aggression.#cheatingwife #Adultery pic.twitter.com/5tRw4b2Xe8
दोघांमधला वाद वाढत गेल्याने आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. संतापलेल्या पतीने पत्नीला घटस्फोटासाठी कोर्टात येण्यास सांगितलं आहे. पत्नीनेही त्याला आपल्याला घटस्फोट हवा असल्याचं म्हटलं आहे. पतीने व्हिडिओमध्ये असाही दावा केला आहे, की ही महिला काही दिवसांपासून त्याच्या कुटुंबाचा छळ करत आहे. किचनपासून बाथरूमपर्यंत एक कंगवा करेल तुमची सर्व कामं; जबरदस्त Kitchen Jugaad Video दोघांनी एकमेकांसाठी अत्यंत अपमानास्पद आणि वाईट भाषा वापरली. सोशल मीडिया युझर्सनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “अत्यंत अपमानास्पद भाषा. नवऱ्यानं अयोग्य भाषा वापरली आहे; पण जेव्हा एखाद्या पुरुषाची बायको दुसऱ्या पुरुषासोबत आयुष्याचा आनंद लुटत नवऱ्याला कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावते, तेव्हा तो पुरुष फ्रस्ट्रेशन बाहेर काढण्याशिवाय दुसरं काय करेल? आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीसोबत बघितल्यानंतर पतीला मारहाण करणाऱ्या स्त्रिया आपण बघितलेल्या आहेत #व्यभिचार,” अशी प्रतक्रिया एका युझरने व्यक्त केली आहे. भाजीविक्रेत्याचं किळसवाणं कृत्य, साचलेल्या पाण्यात धुतल्या भाज्या, घटनेचा Video Viral ‘झी न्यूज’ने स्वतंत्रपणे या व्हिडिओची पडताळणी केलेली नाही. या व्हिडिओमधल्या व्यक्तींची ओळख आणि रेकॉर्डिंगचं ठिकाण याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.