बाप रे! रेड झोनमधून आलेला घोडासुद्धा माणसाप्रमाणं झाला क्वारंटाइन

बाप रे! रेड झोनमधून आलेला घोडासुद्धा माणसाप्रमाणं झाला क्वारंटाइन

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मे : जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनामुळे सर्वांच्या मनात भीती पसरली आहे. कोरोनाचा संसर्ग आता माणसाकडून प्राण्यांनाही होऊ लागला आहे. याआधी वाघीण आणि मांजराला कोरोना झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर आता रेड झोनमधून आलेल्या घोड्ला क्वारंटाइन केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माणसांकडून प्राण्यांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्यानं प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्याची चर्चा आहे. रेड झोन भागातून एक घोडा आणि त्याचा मालक आला. खबरदारी घेत प्रशासनाने घोड्याला घरात क्वारंटाइन करण्यात आलं होतं. ज्या प्रदेशातून हे दोन जण आले होते तो रेड झोन होता. याची माहिती प्रशासनाला माहिती पाठवण्यात आली होती. त्यासोबतच घोड्याच्या मालकाचा नमुना घेण्यात आला आणि त्याला चाचणीसाठी पाठविले. मात्र, मंगळवारी पशुवैद्यकांच्या पथकाने घोड्याची चाचणी घेतली. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आजाराची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. तरीही घोड्याला रेड झोनमधून आल्यानं 14 दिवस होम क्वारंटाइन ठेवण्यात आलं आहे.

कोरोनाव्हायरसमुळं (Coronavirus) ठप्प झालेले व्यवहार चौथ्या लॉकडाऊनमध्ये थोडे थोडे खुले व्हायला सुरुवात झाली आहे. काही प्रमाणात रेल्वे आणि विमान सेवा सुरू झाली आहे. पण तरीही COVID-19 चा प्रादुर्भाव असलेले रेड झोन पूर्ण बंद आहेत. महाराष्ट्रात तर या साथीने कहर केला आहे. त्यामुळे चौथा लॉकडाऊन संपायच्या आधीच पाचवा लॉकडाऊन अटळ असल्याचे संकेत केंद्राने दिले आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सध्या देशात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. पण अजूनही साथ आटोक्यात आलेली नाही. उलट वाढतेच आहे. आता चौथा लॉकडाऊन संपायच्या आतच लॉकडाऊन वाढवण्याची चर्चा सुरू आहे. पण हा पाचवा लॉकडॉऊन स्वयंस्फूर्तीने असेल. याचे निर्बंध आणि नियम ठरवण्याचे अधिकार राज्यांना असतील, असं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मुख्यतः कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या 11 शहरांपुरता तो मर्यादित असू शकतो.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 27, 2020, 4:40 PM IST

ताज्या बातम्या