मराठी बातम्या /बातम्या /Viral /इन्जॉय करायला रिसॉर्टमध्ये गेलेल्या कुटुंबासोबत भीषण प्रकार; जंगलाशेजारीच टेन्टमध्ये होता मुक्काम, अचानक...

इन्जॉय करायला रिसॉर्टमध्ये गेलेल्या कुटुंबासोबत भीषण प्रकार; जंगलाशेजारीच टेन्टमध्ये होता मुक्काम, अचानक...

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या सावटाखाली लोक जगत आहे. त्यात इन्जॉयमेंट म्हणून हे कुटुंब एका रिसॉर्टमध्ये गेलं होतं.

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या सावटाखाली लोक जगत आहे. त्यात इन्जॉयमेंट म्हणून हे कुटुंब एका रिसॉर्टमध्ये गेलं होतं.

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या सावटाखाली लोक जगत आहे. त्यात इन्जॉयमेंट म्हणून हे कुटुंब एका रिसॉर्टमध्ये गेलं होतं.

वायनाड, 24 जानेवारी : केरळमधील वायनाड जिल्ह्यात मेप्पडी येथील रिसॉर्टमध्ये एका जंगली हत्तीने महिला पर्यटकाला पायाखाली चिरडले. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सांगितलं की,  ही हैराण करणारी घटना शनिवारी रात्री 8 वाजता वर्षावन रिसॉर्टमध्ये घडली.

कुटुंबातील दोन सदस्यांसोबत रिसॉर्टमध्ये आली होती महिला

पोलिसांनी सांगितलं की, महिला पर्यटकाचं नाव शहाना होतं आणि ती कन्नूर येथे राहणारी होती. ती कॉलेजमध्ये प्रवक्ता पदावर तैनात होती. त्यांनी सांगितलं की, ती कुटुंबातील दोन सदस्यांसह रिसॉर्टमध्ये आली होती आणि तंबूत राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिसॉर्ट जंगलच्या जवळ असून येथे नियमित जंगली प्राणी येत-जात असतात.

हे ही वाचा-'पत्नी पळून गेली तर विसरून जा, दुसरीचा शोध घ्या'; न्यायाशीधांनी दिला सल्ला

डीएम यांनी रिसॉर्टचा दौरा केल्यानंतर तहसीलदारांना दिला रिपोर्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जंगली हत्तीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून महिला आणि अन्य दोघेजण तंबूतून बाहेर आले होते. यादरम्यान हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी सांगितलं की, अन्य लोकांनी तेथून पळ काढला, मात्र यात महिला गंभीर जखमी झाली. महिलेला रुग्णालयात नेण्यात आले, येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वायनाडचे जिल्हाधिकारी अदीला अब्दुल्ला यांनी रिसॉर्टचा दौरा केला आणि तहसीलदारांना रिपोर्ट दिला आहे.

दरम्यान देशात अद्याप कोरोनाचं सावट आहे. त्यात कोरोनाची लस आल्याकारणाने जनतेने सुटकेचा निश्वा:स सोडला आहे. त्यामुळे अनेक जण फिरायला घराबाहेर पडत आहे. विरंगुळा म्हणून लोक जवळच्या रिसॉर्टमध्ये जाणं पसंत करतात. त्यातच अशी बातमी समोर आली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये आता ‘कोविड 19’ (Covid 19) साथीच्या रोगावर लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाली आहे. सहा ते आठ महिन्यांच्या अथक संशोधनानंतर काही अमेरिका, रशिया, भारत अशा काही मोजक्या देशांना कोरोना विषाणूवरील लस (Corona  Virus Vaccine) विकसित करण्यात यश आलं आहे. अनेक देशांनी या लशीची मागणी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Person death, Wild animal