मराठी बातम्या /बातम्या /Viral /

व्वा रे पठ्ठ्या कमालच केलीस! भंगार वापरून बनवलं Helicopter, आकाशात उडवूनही दाखवलं; पाहा VIDEO

व्वा रे पठ्ठ्या कमालच केलीस! भंगार वापरून बनवलं Helicopter, आकाशात उडवूनही दाखवलं; पाहा VIDEO

या व्यक्तीने चक्क कारच्या पार्टपासून हेलिकॉप्टर तयार केलं आहे.

या व्यक्तीने चक्क कारच्या पार्टपासून हेलिकॉप्टर तयार केलं आहे.

या व्यक्तीने चक्क कारच्या पार्टपासून हेलिकॉप्टर तयार केलं आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 13 डिसेंबर : जुगाड (Jugaad video) हा शब्द तुमच्यासाठी नवीन नाही. अगदी कमीत कमी खर्चात काहीतरी हटके करून दाखवण्याचं कौशल्य काही जणांकडे असतं. जुगाडाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा आहेत, ज्यात एका व्यक्तीने चक्क जुगाड करून हेलिकॉप्टर (Helicopter video) तयार केलं आहे. त्याने फक्त हेलिकॉप्टर तयारच केलं नाही तर ते आकाशात उडवूनही दाखवलं आहे (Helicopter jugaad video) .

एका व्यक्तीने हेलिकॉप्टर तयार केलं आहे. आता हेलिकॉप्टर बनवणं म्हणजे त्यासाठी रिसतर प्रशिक्षण, त्यासाठी आवश्यक असलेले पार्ट्स हवेत. पण या व्यक्तीने चक्क कारच्या पार्टपासून हेलिकॉप्टर तयार केलं आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत आणि या व्यक्तीचं कौतुकही करत आहेत.

व्हिडीओत पाहू शकता एका रस्त्यावर एक हेलिकॉप्टर उभं आहे. तसं हे हेलिकॉप्टर एरवी आपण पाहतो अगदी तशा हेलिकॉप्टरसारखं दिसत नाही. कारण ते ज्या पद्धतीने बनवण्यात आलं आहे ते त्यामुळे ते खास आहे.

हे वाचा - व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी! चक्क बाईकची कार बनवली; तरुणाने काय केला जुगाड पाहा VIDEO

सुरुवातीला पाहू शकता या हेलिकॉप्टरच्या वरील पंख गरगर फिरू लागतात. त्यानंतर या हेलिकॉप्टरमध्ये असलेली व्यक्ती हे हेलिकॉप्टर आधी रस्त्यावर चालवते. जसं विमान धावपट्टीवर आधी पळतं आणि मग उडतं. तशीच ही व्यक्ती हे हेलिकॉप्टर आधी रस्त्यावर चालवताना दिसते. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर हे हेलिकॉप्टर उडतानाही दिसतं. व्हिडीओ पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. असं काही होऊ शकतं, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही आहे.

@MendesOnca ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार कारचे काही पार्ट आणि Volkswagen Beetle engine हे हेलिकॉप्टर तयार करण्यात आलं आहे.

हे वाचा - चक्क ऑटोची झाली आलिशान स्कॉर्पिओ कार; VIDEO पाहून तुम्हीही चक्रावाल

हेलिकॉप्टरचा हा जुगाड नेटिझन्सना आवडला आहे. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

First published:

Tags: Helicopter, Viral, Viral videos