जाहिरात
मराठी बातम्या / Viral / एका क्षणांत डोळ्यादेखत कोसळली भलीमोठी दरड, पाहा LIVE VIDEO

एका क्षणांत डोळ्यादेखत कोसळली भलीमोठी दरड, पाहा LIVE VIDEO

एका क्षणांत डोळ्यादेखत कोसळली भलीमोठी दरड, पाहा LIVE VIDEO

गेल्या चार दिवसांत भूस्खलन आणि दरड कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बद्रीनाथ, 28 ऑगस्ट : गेल्या अनेक दिवसांपासून उत्तराखंड परिसरात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. वारंवार दरड कोसळणं आणि महापुराची स्थिती निर्माण झाल्यानं नागरिक त्रस्त आहेत. शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा डोळ्यादेखत डोंगराचा एक भलामोठा भाग कोसळून रस्त्यावर आला आहे. यामध्ये मोठी झाडं, माती आणि दगडही कोसळले आहेत. मुसळधार पावसामुळे चमोलीच्या पुरसारी भागात भूस्खलन झालं. त्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग गेल्या 17 तासांपासून बंद आहे. राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ पथक महामार्गावरील मातीचा ढिग बाजूला करण्यासाठी काम करत आहे. सध्या या महामार्गावरून कोणतंही वाहन जाऊ शकत नाही त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जाहिरात

हे वाचा- दुचाकी चालवताना अचानक 2 फूट हवेत उडाले बाईकस्वार, पाहा भीषण अपघाताचा थरारक VIDEO सोमवारी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यानं उत्तरकाशी इथल्या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. हे भूस्खलन खूप मोठ्या प्रमाणात झाल्यानं माती, दगड, झाडं आणि मलबा महामार्गावर आला आहे. भूस्खलन होत असताना जवळपास अनेक लोक आपल्या कॅमेऱ्यात ही घटना कैद करत होते. मोठ्या प्रमाणात डोंगराचा हिस्सा कोसळू लागल्यानं मात्र मोठी खळबळ उडाली आणि पळापळ सुरू झाली होती. त्यानंतर पुन्हा तीन दिवसांत आज भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात