नवी दिल्ली, 26 मे : आधुनिक जगात प्रत्येकाच्या आयुष्यात सोशल मीडियानं जागा घेतली आहे. अनेकजण त्यांचा अधिक वेळ सोशल मीडिया वापरण्यातच घालवतात. सोशल मीडिया हे एक मनोरंजनाचं साधनच बनलं आहे. याठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ समोर येत असतात. अनेक मजेशीर, भावुक, आश्चर्यकारक, भितीदायक व्हिडीओ इंटरनेटवर गराळा घालत असतात. नुकताच एक हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुम्हीही भावूक व्हाल. एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये तो आपल्या दिवंगत पत्नीवर किती प्रेम करतो हे दिसून येत आहे. हा व्हिडीओ हृदयाला स्पर्श करणारा असून व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक वृद्ध रस्त्याच्या कडेला रसबत पित आहे. सरबत पिण्याअगोदर त्याने जे केलं ते भावुक करणारं आहे. वृद्ध त्याच्या सायकलवर बसला असून एका हातात सरबत आणि दुसऱ्या हातात दिवंगत पत्नीचा फोटो दिसत आहे. तो सरबत पिण्याअगोदर त्याच्या दिवंगत पत्नीच्या फोटो समोर सरबत घेऊन जातो. जणूकाही तो तिला सरबतच पाजत आहे. तो दिवंगत पत्नीच्या फोटोला पहिले सरबत दाखवतो आणि मग स्वतः पितो.
वृद्धाच्या कृतीवरुन तो त्याच्या पत्नीवर किती प्रेम करतो हे पहायला मिळालं. हा हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ @gurpinder_sandhu33 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही पहायला मिळत आहे. दरम्यान, पती पत्नीचे प्रेम दाखवणारे व्हिडीओ यापूर्वीही समोर आले आहेत. असे व्हिडीओ पाहून नेटकरीही भावुक होताना दिसतात. अशा व्हिडीओला अनेक व्ह्युज आलेले पहायला मिळतात.