जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO VIRAL : नापास होईल वाटत होतं, पण झाला पास; पठ्ठ्याने केला खतरनाक डान्स

VIDEO VIRAL : नापास होईल वाटत होतं, पण झाला पास; पठ्ठ्याने केला खतरनाक डान्स

पास झाल्यावर पठ्ठ्याचा खतरनाक डान्स

पास झाल्यावर पठ्ठ्याचा खतरनाक डान्स

29 मे ला 10 वीचा निकाल लागला. देशभरात सर्वत्र निकालाची धूम पहायला मिळत होती. यामध्ये अनेकजण चांगल्या नंबरने पास झाले तर कुणाला अपयश आलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

राहुल खंडारे, बुलढाणा, 05 जून : 29 मे ला 10 वीचा निकाल लागला. देशभरात सर्वत्र निकालाची धूम पहायला मिळत होती. यामध्ये अनेकजण चांगल्या नंबरने पास झाले तर कुणाला अपयश आलं. त्यामुळे आनंद दुःख सर्वच भावना निकालाच्या दिवशी दिसून येत होत्या. सोशल मीडियावर 10 वी विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले. प्रत्येक व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या भावना पहायला मिळाल्या. यामध्ये बुलढाण्यातील एका विद्यार्थ्यांचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला. एका दहावीच्या विद्यार्थ्याने अभ्यास न करता पेपर दिला होता. त्यामुळे तो नापासच होणार असं त्याला वाटत होतं. मात्र याच्या उलट घडलं आणि विद्यार्थी चक्क चांगल्या नंबरने पास झाला. निकाल येताच विद्यार्थ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याने तुफान डान्स केला. सध्या त्याचा तो डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

बुलडाणा जिल्ह्यातील लोखंडा या गावचा जय बोरसे कुठल्या ही प्रकार चा अभ्यास न करता 10 वी मध्ये पास झाला. आपण अभ्यासच केला नाही तर पास कसे होणार हा प्रश्न त्या विद्यार्थ्या समोर होता मात्र नुकताच 10 वी चा निकाल लागला आणि तो पास झाला आपण पास झाल्याचे कळताच त्याला आनंद आवरता आला नाही आणि त्याने भन्नाट डान्स केला. 10 मध्ये पास होईल की नाही याची शंका त्या विद्यार्थ्याला होती मात्र त्याला 58 टक्के मिळाले असून त्याने बेभान डान्स केला.

जाहिरात

हिवरखेड येथील शाळेत शिकणारा जय बोरसे नामक विद्यार्थ्याचा डान्स पाहून अनेकांना आपला हसू आवरता आलं नाही तर आता तो डान्स सोशल मीडियावर धूम करत आहे. या व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा पहायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात