जाहिरात
मराठी बातम्या / Viral / महिनाभर पगारी रजेसाठी त्याने चार वेळा रचला लग्नाचा घाट; हा प्रकार वाचून तुम्हीही व्हाल चकीत

महिनाभर पगारी रजेसाठी त्याने चार वेळा रचला लग्नाचा घाट; हा प्रकार वाचून तुम्हीही व्हाल चकीत

 रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधून येते असं सांगून माहेरी गेलेली नववधू परत आलीच नाही.

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधून येते असं सांगून माहेरी गेलेली नववधू परत आलीच नाही.

नोकरदार माणसांच्या ज्या काही समस्या असतात, त्यातली एक महत्त्वाची समस्या म्हणजे हवी तेव्हा रजा मिळण्याची. अनेक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हवी तेव्हा रजा मिळत नाही, किंवा रजा मिळालीच तर पुरेशी मिळत नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

    तैपेई, 16 एप्रिल : नोकरदार माणसांच्या ज्या काही समस्या असतात, त्यातली एक महत्त्वाची समस्या म्हणजे हवी तेव्हा रजा मिळण्याची. अनेक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हवी तेव्हा रजा मिळत नाही, किंवा रजा मिळालीच तर पुरेशी मिळत नाही. मग तडजोडी करणं आलंच. काही वेळा अत्यंत महत्त्वाचं कारण असूनही कर्मचाऱ्यांना रजा मिळत नाही, तर काही वेळा काही कर्मचारी खोटंनाटं कारण सांगून रजा मिळवण्याचा प्रयत्न करतात. काही जण त्यात यशस्वी होतात. तर काही जण मात्र अडकतात. तैवानमधल्या अशाच एका कर्मचाऱ्याची लबाडी पकडली गेली; पण लबाडी त्याने केली असली, तरी त्याचा फटका मात्र तो काम करत असलेल्या संस्थेला बसला. त्या कर्मचाऱ्याने रजा मिळण्यासाठी काय केलं होतं,ते वाचलं तर विश्वासच बसणार नाही. ‘टाइम्स नाऊ न्यूज’ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.  तैवानमधल्या एका बँकेत क्लार्क म्हणून काम करत असलेल्या एका व्यक्तीला लग्न करायचं होतं; पण कायद्यानुसार मिळणारी आठ दिवसांची भरपगारी रजा त्याला पुरेशी वाटत नव्हती. त्याला त्याहून जास्त भरपगारी रजा (Paid Leave)हवी होती. त्यासाठी त्याने काय करावं? तर पठ्ठ्याने फक्त 37 दिवसांच्या काळात एका महिलेशी तब्बल चार वेळा लग्न केलं. अर्थात, त्यासाठी त्याला तिला तीन वेळा घटस्फोट (Divorce) द्यावा लागला.  पहिल्यांदा त्याने लग्नासाठीच्या रजेची (Marriage Leave) मागणी केली, तेव्हा बँकेने त्याला आठ दिवसांची भरपगारी रजा मंजूर केली. गेल्या वर्षी सहा एप्रिल रोजी तो पहिल्यांदा विवाहबद्ध झाला. लग्नासाठी मिळालेली आठ दिवसांची रजा संपल्याच्या दिवशी त्याने पत्नीला घटस्फोट दिला आणि दुसऱ्याच दिवशी तिच्याशी परत लग्न केलं. त्यानंतर लगेचच त्याने बँकेत आणखी आठ दिवसांच्या रजेसाठी अर्ज केला. असं त्याने एकूण तीन वेळा केलं आणि चार लग्नांसाठी 32 दिवस भरपगारी रजा कायद्याने आपल्याला मिळेल, असं त्याला वाटलं.  दरम्यान, सगळं त्याच्या मनाप्रमाणे घडलं नाही. बँकेने तो असं का करतोय, यामागचं कारण शोधून काढलं आणि त्याला या कारणासाठी आठ दिवसांपेक्षा अधिक भरपगारी रजा देण्यास नकार दिला. नकार मिळाल्यानंतरही त्याने स्वतः ठरवल्याप्रमाणे तीनवेळा घटस्फोट देऊन चार वेळा लग्न केलं. त्यानंतर त्याने आपण काम करत असलेल्या बँकेविरोधात तैपेई सिटी लेबर ब्यूरोकडे (Taipei City Labour Bureau) तक्रार दाखल केली. आपल्याला भरपगारी रजा न देऊन बँकेने लेबर लीव्हरूल्सच्या (Labour Leave Rules)कलम दोनचं उल्लंघन केलं आहे, असा आरोप त्याच्यातर्फे ठेवण्यात आला.  तिथल्या कायद्यानुसार लग्नासाठी कंपनीने कर्मचाऱ्याला आठ दिवस भरपगारी रजा देणं बंधनकारक आहे. मग आपली चार लग्नं झाली असल्यामुळे 32 दिवस भरपगारी रजा मिळायला हवी, असा त्याचा दावा होता.  आता यात खरं म्हटलं तर बँकेचं काही चुकलं नसून, कर्मचाऱ्याचीच चूक आहे, असं आपल्याला वाटेल; पण प्रत्यक्षात तैपेई सिटीलेबर ब्यूरोने त्या बँकेलाच कामगार कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल ऑक्टोबर 2020 मध्ये NT$20,000 म्हणजेच सुमारे 52 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावला.  न्यूटॉक तैवानने दिलेल्या वृत्तानुसार, बँकेने आपली बाजू मांडताना असा दावा केला होता, की मॅरेज लीव्हचा गैरवापर करून रजा मिळवणं लेबर लीव्ह रूल्समध्ये बसत नाही.  पण 10 एप्रिल 2021 रोजी बैशी लेबर ब्यूरोनेही आधीचाच निकाल उचलून धरला. ‘त्या क्लार्कचं वागणं अनैतिक आहे; पण त्याने कायदा मोडलेला नाही; पण बँकेने मात्र लेबर लीव्ह रूल्सच्या कलम दोनचं उल्लंघन केलं आहे,‘अशी टिप्पणी ब्यूरोने केली.  ही केस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली नसती, तरच नवल. तैवानमधल्या कामगार कायद्यात अशी त्रुटी आहे, यावर अनेकांचा विश्वासच बसला नाही. रजा मिळवण्यासाठी केलेल्या या उपद्व्यापात त्याच्या’बेटर हाफ’नेही साथ दिली आणि फुकटचा भुर्दंड मात्र बँकेला भरावा लागला.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात