मुंबई, 6 जुलै: सध्या आर्थिक क्षेत्रात एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्यातील मेगा विलीनीकरणाची चर्चा आहे. या विलीनीकरणापूर्वी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी राजीनामा दिला असून, आपल्या कर्मचार्यांसाठी एक भावनिक नोट शेअर केली आहे. त्यानंतर लगेचच पारेख यांच्या एचडीएफसी बँकेतील ऑफर लेटरचा फोटो व्हायरल झाला. हे पारेख यांचं पहिलं ऑफर लेटर असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या 19 जुलै 1978 च्या या पत्रात पारेख यांचा पगार आणि रोजगार कराराच्या अटींचा तपशील आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या पत्रानुसार, पारेख यांना डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून नियुक्ती मिळाली होती. पारेख यांना 3 हजार 500 रुपये मूळ वेतन आणि 500 रुपये निश्चित महागाई भत्ता देऊ केलेला होता. शिवाय 45 वर्षांपूर्वीच्या या पत्रात 15 टक्के घरभाडे भत्ता (एचआरए) आणि 10 टक्के शहर भत्ता यांचादेखील उल्लेख आहे. आपल्या नातेवाईकाच्या फर्ममध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या पारेख यांना त्यावेळी कॉर्पोरेशनचा भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, वैद्यकीय लाभ, रजा प्रवास सुविधा आणि निवासी फोनच्या खर्चाची रक्कमदेखील देण्यात आली होती. पारेख यांनी एचडीएफसीमध्ये 45 वर्षांची प्रदीर्घ सेवा दिली आहे. आता मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वयासंबंधी अटींमुळे त्यांना एचएडीएफसी बँकेच्या संचालक मंडळावर सेवा देता येणार नाही. पारेख यांच्या प्रयत्नांमुळे एचडीएफसीच्या पाच कंपन्या सार्वजनिक झाल्या आहेत. एचडीएफसीनं त्यांच्या नेतृत्वाखाली नऊ दशलक्षांहून अधिक भारतीयांना होमलोन दिलं आहे. Credit Card चा पूर्ण फायदा घ्यायचाय? मग या 3 पद्धतींनी करा वापर, वाचतील भरपूर पैसे “भविष्याची अपेक्षा आणि आशा या दोन्हींसह आता माझे जबाबदारीचे बूट काढून ठेवण्याची वेळ आली आहे. एचडीएफसीच्या भागधारकांशी हा माझा शेवटचा संवाद असेल. पण, खात्री बाळगा की, आता आपण विकास आणि समृद्धीच्या अतिशय रोमांचक भविष्याकडे वाटचाल करत आहोत. एचडीएफसीतील अनुभव अमूल्य आहे. आमचा इतिहास नाहीसा होणार नाही उलट आमचा वारसा पुढे नेला जाईल,” असं पारेख यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पत्रात भागधारकांना सांगितलं. Yes Bank च्या ग्राहकांसाठी गुडन्यूज! आता मिळणार ‘ही’ खास सुविधा एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचं विलीनीकरण 1 जुलै रोजी अंमलात आलं. ज्यामुळे भारतातील पहिली गृह वित्त कंपनी असलेली एचडीएफसी ही बँकेच्या ताब्यात गेल्यानंतर एचडीएफसी बँक ही जगातील चौथी सर्वांत मोठी बँक बनली आहे. एचडीएफसी बँकेनं गेल्या वर्षी 4 एप्रिल रोजी 40 अब्ज डॉलर्सचा करार मान्य केला होता. आता, एचडीएफसी बँक 100 टक्के सार्वजनिक भागधारकांच्या मालकीची आहे तर एचडीएफसीचे 41 टक्के शेअर्स विद्यमान भागधारकांकडे आहेत. 13 जुलै ही विलीनीकरणाची नोंदणीकृत तारीख आहे. 14 जुलैपासून एचडीएफसी शेअर्सचे व्यवहार थांबतील. सर्व भागधारकांना एचडीएफसी लिमिटेडमध्ये असलेल्या प्रत्येक 25 समभागांमागे एचडीएफसी बँकेचे 42 शेअर्स मिळतील. विलीनीकरणानंतर, एचडीएफसी बँक ही देशातील सर्वांत मोठी खासगी बँक असेल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.