लंडन, 15 जुलै : रेल्वे स्टेशनवर तुम्ही ऐकलं असेल ट्रेन येत असेल तर रूळांमधून एक आवाज येतो किंवा ट्रेनच्या खाली सब-वे असेल आणि वरून ट्रेन गेली तरी धडकी भरवणारा असा आवाज येतो. पण एक असं रेल्वे स्टेशन ज्याच्या प्लॅटफॉर्मखालून भयावह आवाज येत होता. अखेर या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या खाली जाण्यात आलं, तेव्हा तिथं जे दिसलं ते पाहून सर्वांना घाम फुटला. लंडनमध्ये असलेलं हे रेल्वे स्टेशन. माय लंडन वेबसाईटची रिपोर्टर अॅना विलिस लंडनच्या मध्यभागी असलेल्या वॉटरलू रेल्वे स्टेशनवर गेली. तिथं अंडरग्राऊंड रूम होत्या. तब्बल 16 खोल्या तिथं होत्या. या रूममध्ये ती गेली. स्टेशनचा हा सर्वात हंटेड भाग म्हणून ओळखला जातो. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मखाली असलेल्या या ठिकाणाबाबत अनेकांना माहिती नाही.
बापरे! बसमध्ये भूत? धडावर डोकं नसलेल्या व्यक्तीचा फोटो व्हायरल होताच उडाली खळबळ
अॅना म्हणाली, हा अनुभव अनोखा होता. ती जागा इतकी भीतीदायर होती की तिथून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी सर्वजण धडपडत होते. जेव्हा आम्ही तिथं गेलो तेव्हा भिंतीतून लोकांचे हळुवार आवाज ऐकू येत होते. तिच्या अंगावर काटाच उभा राहिला. सुरुवातीला ती खूप घाबरली. तिच्यासोबत असलेल्या टूर गाईडने तिला ते आवाज खरे असल्याचं सांगितलं. पण त्या आवाजांचं सत्य मात्र वेगळं होतं. भिंतीतून येणारे ते आवाज 175 वर्षे जुन्या स्टेशनखाली अडकलेल्या आत्म्याचे नाहीत. स्टेशनच्या पब्लिक अॅड्रेस सिस्टीमसाठी एक चाचणी किट तिथं ठेवली होती. त्यामुळे वरील घोषणांचे आणि गोंधळाचे आवाज ऐकू येत होते.
‘मृत्यू’ची डुलकी! निद्रालोकातूून यमलोकात पोहोचली व्यक्ती; भयानक LIVE VIDEO
अलीकडेच वॉटरलू स्टेशनला 175 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1848 मध्ये जेव्हा ते उघडण्यात आलं. काही काळ या स्टेशनच्या आत सिनेमा होता.
(फोटो: Anna Willis/MyLondon via Daily Star)
मूळ स्टेशनची इमारत 1902 मध्ये कोसळली, ज्यामुळे वॉटरलूचा विस्तार झाला आणि नंतर 1941 मध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात ती इमारतही कोसळली