मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बंगळुरूतील क्रिप्टो ट्रेडर चहावाला; ऑनलाइन पेमेंटसह स्वीकारतो क्रिप्टो करन्सी; उद्योगपतीने शेअर केला फोटो

बंगळुरूतील क्रिप्टो ट्रेडर चहावाला; ऑनलाइन पेमेंटसह स्वीकारतो क्रिप्टो करन्सी; उद्योगपतीने शेअर केला फोटो

भारतातील हा चहा विक्रेता क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे घेतो

भारतातील हा चहा विक्रेता क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे घेतो

रस्त्यावरील चहावाल्याकडे क्रिप्टो करन्सी स्वीकारली जाईल, असा बोर्ड पाहायला मिळाला तर ही बाब आश्चर्यकारक म्हणावी लागेल. बंगळुरमध्ये रस्त्यावरील चहा विक्रेत्याने क्रिप्टो करन्सी स्वीकारली जाईल असा बोर्ड लावल्याने सर्व देशाचे लक्ष तिकडं वेधलं जात आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 3 डिसेंबर: बाजारात एखादी वस्तू किंवा सेवा घेतल्यानंतर आज पैसे देण्याची गरज पडत नाही. ठिकठिकाणी कोड स्कॅन करून डिजिटल पद्धतीने पैसे दिले जात आहेत. अगदी चहाचा गाडा असो किंवा पान टपरी तिथंही ही सुविधा उपलब्ध झालेली आहे. फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम स्कॅनर सर्वच ठिकाणी पाहायला मिळतील. परंतु, रस्त्यावरील चहावाल्याकडे क्रिप्टो करन्सी स्वीकारली जाईल, असा बोर्ड पाहायला मिळाला तर ही बाब आश्चर्यकारक म्हणावी लागेल. बंगळुरमध्ये रस्त्यावरील चहा विक्रेत्याने क्रिप्टो करन्सी स्वीकारली जाईल असा बोर्ड लावल्याने सर्व देशाचे लक्ष तिकडं वेधलं जात आहे. ‘टीव्ही नाईन हिंदी’नं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

मागील काही वर्षांपासून जगभरामध्ये सर्वाधिक चर्चा होणाऱ्या गोष्टीत क्रिप्टो करन्सीचा सहभाग आहे. क्रिप्टो करन्सीनं जगभरातील अनेक लोकांना एका रात्रीत कोट्यधीश व अब्जाधीश बनवलं आहे. वास्तविक पाहता अनेक देशांसह भारतामध्येही क्रिप्टो करन्सीचे व्यवहार करण्यास मान्यता नाही. परंतु तरीही मोठ्या संख्येने लोक क्रिप्टो करन्सीची खरेदी करत अफाट नफा कमवत आहेत. भारतात क्रिप्टो करन्सी कायदेशीररित्या मान्य नसली तरी बंगळुरूतील एका चहावाल्याने क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून चहाचे पैसे घेतले जातील असा बोर्ड लावल्याने तो अल्पावधीत प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध बिझनेसमन हर्ष गोयंका यांनी त्यांच्या ट्विटर वॉलवरून एक फोटो शेअर केला आहे. यात एक व्यक्ती चहा बनवताना दिसत आहे. लोकांना ऑनलाइन पेमेंट करता यावे यासाठी त्याच्या चहा स्टॉलसमोर पेटीएमचा क्यूआर कोड ठेवलेला दिसतो. पेटीएम स्कॅनरच्या बाजूलाच क्रिप्टो करन्सी स्वीकारली जाईल, असा बोर्ड लावलेला असल्याने त्याच्याकडे अधिक लक्ष वेधले जात आहे. हर्ष गोयंका यांनी फोटो शेअर करताना त्यावर ‘न्यू इंडिया’ असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा - बापरे! 15 सेकंदाला विकला जाणार AC, अहवालात धक्कादायक माहिती समोर

क्रिप्टोत कमाईसाठी शेवटच्या वर्षी सोडले शिक्षण

क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे स्वीकारणारा बंगळुर येथील हा चहावाला अल्पावधीत लोकप्रिय बनला. माध्यमातील बातम्यानुसार, या चहावाल्याचे नाव शुभम सैनी आहे. तो एक क्रिप्टो ट्रेडर आहे त्याने बीसीएचा कोर्स केला असून क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून पैसे जमवण्यासाठी पूर्णवेळ ट्रेडिंग करण्याच्या दृष्टीने त्याने शेवटच्या वर्षी शिक्षण सोडून दिले होते.

क्रिप्टोमध्ये मोठा फटका बसला

शुभमने सुरुवातीला गुंतवणूक केल्यानंतर त्याला उत्तम पैसा मिळाला 2020 मध्ये जेव्हा क्रिप्टोचा बाजारामध्ये घसरण झाली त्यावेळी शुभमने जवळपास दीड लाख रुपये गुंतवणूक केली होती. काही महिन्यातच दीड लाखाचे तीस लाख रुपये त्याला मिळाले. परंतु 2021 मध्ये क्रिप्टो मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात घसरण झाली आणि शुभमला मोठा फटका बसला. त्याची 90 टक्के रक्कम गेली. त्यानंतर शुभमने चहाचा स्टॉल टाकला. आजही तो क्रिप्टोच्या माध्यमातून पेमेंट घेत असल्याने त्याची मोठी चर्चा होत आहे.

First published:

Tags: Cryptocurrency, Money