मराठी बातम्या /बातम्या /Viral /गुटखा खाताना दिसला नवरदेव, मुलीनं उचललं हे पाऊल

गुटखा खाताना दिसला नवरदेव, मुलीनं उचललं हे पाऊल

एका नवरदेवाला भर लग्नात गुटखा खाणं चांगलंच महागात पडलं आहे. नवऱ्या मुलीनं टोकाचं पाऊल उचललं आहे.

एका नवरदेवाला भर लग्नात गुटखा खाणं चांगलंच महागात पडलं आहे. नवऱ्या मुलीनं टोकाचं पाऊल उचललं आहे.

एका नवरदेवाला भर लग्नात गुटखा खाणं चांगलंच महागात पडलं आहे. नवऱ्या मुलीनं टोकाचं पाऊल उचललं आहे.

लखनऊ, 10 जून: एका नवरदेवाला भर लग्नात गुटखा खाणं चांगलंच महागात पडलं आहे. नवरदेवाला गुटखा खाताना बघून नवऱ्या मुलीनं वरात आल्या पावलीच माघारी पाठवली आहे. लखनऊमध्ये (Lucknow)ही घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी प्रतापगड जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली होती. दारुच्या नशेत वरात घेऊन आलेल्या नवरदेवाला मुलीनं पळवून लावलं होतं. त्यानंतर आता आठवड्याभरात लखनऊमध्ये ही दुसरी घटना घडली आहे. (bride broke the wedding)

नेमकी घटना काय?

5 जूनला मिश्रौली गावात राहणाऱ्या एका मुलीचं लग्न खेजुरी गावातल्या मुलासोबत होणारं होतं. जेव्हा नवरा मुलगा वरात घेऊन आला त्यावेळी तो गुटखा खात होता. नवरदेवाला गुटखा खाताना बघून मुलीनं लग्न करण्यास नकार दिल्याचं मनियार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी शैलेंद्र सिंह यांनी सांगितलं.

हेही वाचा- मुंबईत कोसळू शकतात या 21 इमारती, म्हाडाकडून यादी जाहीर

मुलीला समजवण्याचा प्रयत्न अयशस्वी

ज्यावेळी मुलीनं लग्न करण्यास नकार दिला त्यानंतर दोन्ही बाजूचे वऱ्हाडींनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी आपल्या निर्णयावर ठाम होती. हा मुलगा गुटखा खातो. मी या मुलासोबत लग्न करु शकत नाही, असं थेट मुलीनं आपल्या कुटुंबियांना सांगितलं. बराच वेळ समजवल्यानंतरही मुलगी लग्नासाठी तयार झाली नाही. त्यानंतर हे लग्न रद्द करुन आलेली वरात आल्या पावलीच माघारी परतली.

यूपीत आठवड्याभरातली ही दुसरी घटना

उत्तर प्रदेशमध्ये एका आठवड्यातच अशाप्रकरची दुसरी घटना घडली आहे. याआधी प्रतापगड जिल्ह्यात एका नवऱ्या मुलीनं मंडपात आलेल्या नवरदेवाला परत पाठवलं. नवरदेव दारुच्या नशेत मंडपात पोहोचला आणि त्यानं मुलीला डान्स करण्यासाठी जबरदस्ती केली. हीच गोष्ट मुलीला सहन झाली नाही. तिनं लग्न करण्यास नकार दिला.

First published:
top videos

    Tags: Marriage, Uttar pradesh