Home /News /viral /

VIDEO - लग्नासाठी घेतली मोठी रिस्क! उतावळ्या नवरदेवाची वऱ्हाड्यांसह पुराच्या पाण्यात उडी

VIDEO - लग्नासाठी घेतली मोठी रिस्क! उतावळ्या नवरदेवाची वऱ्हाड्यांसह पुराच्या पाण्यात उडी

नवरदेवाला लग्नाची इतकी घाई होती की तो वऱ्हाड्यांसह पुराच्या पाण्यात उतरला. पुरातून लग्नाची वरात निघाली.

  मुंबई, 05 ऑगस्ट : उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग अशी म्हण आपल्याकडे आहे. अशाच लग्नासाठी उतावळ्या झालेल्या एका नवरदेवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा नवरदेव लग्नासाठी इतका उतावळा झाला की त्याने मोठी रिस्क घेतली. पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात त्याने वऱ्हाड्यांसह उडी घेतली. पुराच्या पाण्यातून निघालेल्या लग्नाच्या या अजब वरातीची चर्चा सर्वत्र होते आहे. पावसात बाहेर पडायला लोक खूप वैतागतात. थोडं पाणी साचलं तरी लोक घराबाहेर पडत नाही अशात पुरात तर आपला जीव धोक्यात कुणीच टाकणार नाही. पण अशाच पुरातून लग्नाची वरात निघाली. नवरदेवाला नवरीबाईला भेटण्याची, तिला लग्न करून आपल्या घरी नेण्याची इतकी घाई होती की वऱ्हाड्यांना घेऊन तो पुराच्या पाण्यात उतरला. व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हे वाचा - VIDEO - जेवणात तेल कमी घालायला सांगितलं म्हणून भडकली आई; रागात लेकाला... व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एका नवरदेव पुराच्या पाण्यात उतरतो. एका व्यक्तीने त्याचा हात धरला आहे. आपण बुडू की काय अशी भीती नवरदेवाला आहे. भीतीने तो थरथरतानाही दिसतो आहे. पण तरी तो मागे हटला नाही. काही झालं तरी लग्न करणारच असा निश्चयच त्याने केला आहे आणि हा दृढ संकल्प घेऊनच तो आपलं पाऊल हळूहळू पुढे टाकतो आहे.
  nareshsharma5571  इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला  'सात समुंदर पार मैं तेरे पीछे-पीछे आ गया' हे गाणं ऐकायला मिळतं आहे. हे गाणं या नवरदेवाने सार्थकी लावलं, गाण्याचा खरा अर्थ समजावला, अखेर कुणासाठी तरी राजकुणार सात समुद्र पार करून आला, अशा कमेंट केल्या आहेत. तर काहींनी इतकी घाई काय आहे, लग्नाची तारीख बदलायची असा सल्ला दिला. तर काहींनी यांना पावसातच लग्नाची का आठवण येते पूर्ण वर्षभर काय करतात, असा सवाल उपस्थित केला आहे. हे वाचा - अजबच! बायकोनंच दिली नवऱ्यासाठी गर्लफ्रेंड शोधायला जाहिरात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bridegroom, Marriage, Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या