शशिकांत ओझा, प्रतिनिधी पलामू, 29 जून : आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या विवाहसोहळ्याच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. विवाहमंडपात वधू-वराने बुलेटवर, किंवा कारने एंट्री केल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण आता आणखी एक वेगळ्या विवाहसोहळ्याची बातमी समोर आली आहे. एक तरुण थेट रुग्णवाहिकेने लग्नात पोहोचला. झारखंडच्या पलामूमध्ये घडलेल्या हा विवाहसोहळा फार चर्चेचा विषय ठरला आहे. नेमकं काय घडलं - पलामूच्या कांडी येथील रहिवासी सुदर्शन मिश्रा यांचे चिरंजीव चंद्रेश मिश्रा याचा विवाह पनेरी बांध गावातील प्रेरणा मिथिलेश मिश्रा या तरुणीसोबत 25 जूनला झाला. यावेळी जखमी अवस्थेतच वर चंद्रेश मिश्रा हा विवाहसोहळ्यात पोहोचला. रुग्णवाहिकेत तो वऱ्हाडी घेऊन आला आणि स्ट्रेचरवर बसूनच त्याने लग्न केले.
चंद्रेश हा एका कारने लग्नाच्या खरेदीसाठी 22 जूनला गढवा इथे गेला होता. तो स्वतः दोनदा गाडी चालवत गेला. मात्र तिसर्यांदा गावाकडून गढवाकडे जात असताना त्याची कार झाडावर आदळली. एअर बॅगने त्याचा जीव वाचवला. मात्र, या अपघातात तो जखमी झाला. त्यामुळे लग्नात त्याला रुग्णवाहिकेने जावे लागले.
वधूचा भाऊ प्रणेश मिश्र याने लोकल18 ला सांगितले की, अशा प्रकारचे लग्न बहुधा पहिल्यांदाच झाले असावे, ज्यात वऱ्हाडीने अॅम्ब्युलन्समध्ये लग्नाची वरात आणली. 23 जूनला साखरपुडा आणि 25 जूनला लग्न होते. मात्र, 22 जून रोजी संध्याकाळी मेहुणे स्वत: गाडी चालवून बाजारात जात होते. दरम्यान, पावसामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणइ ते कारवर जाऊ आदळले. या अपघातात त्यांच्या पाठीला दुखापत झाली. दुसऱ्या दिवशीच विवाह सोहळा होणार असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना घरी आणण्यात आले. यावेळी विवाहसोहळ्याच्या निमित्ताने सर्व पाहुणे घरी आले होते. त्यामुळे मेहुण्यांनी धाडस करत विवाहसोहळ्यात घेतला आणि लग्नाचे विधी पूर्ण केले. स्ट्रेचर बसूनच त्यांनी वधूच्या गळ्यात हार घातला. या विवाहसोहळ्याची परिसरात चर्चा होत आहे.