नवी दिल्ली, 21 जुलै : लोक आजकाल काहीही स्ंटट करत आहे. काहीजण सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी काहीतरी हटके करण्याच्या प्रयत्नात असे काही प्रकार करतात. सोशल मीडियावर तुम्ही आत्तापर्यंत अनेक स्टंट व्हिडीओ पाहिले असतील. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच स्टंट करताना दिसतात. कधी कधी असे स्टंट लोकांना महागात पडतात. तर काही असे स्टंट असतात की तुम्ही त्याचा कधी विचारही केला नसेल. असाच काहीसा व्हिडीओ समोर आला असून तुम्ही तरुणाचा कारनामा पाहून थक्क व्हाल. तरुणाचा कारनामा दाखवतानाचा एक स्टंट व्हिडीओ समोर आला आहे. त्यानं चक्क डोक्यावर काचेचे ग्लास त्यावर गॅस सिलेंडर त्यावर हंडा ठेवत कर्तब दाखवली आहे. तुम्ही त्याचं धाडस आणि त्याचा समतोल साधन्याची कला पाहून चाट पडाल.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण धाडसानं कर्तब दाखवत आहेत. तो भररस्त्याच्या मधोमध उभा राहिलाय आणि त्याच्या डोक्यावर काही वस्तू ठेवल्या आहेत त्याला बॅलन्स करत लोकांचं लक्ष त्याच्याकडे वळवत आहे. त्यानं सुरुवातीला डोक्यावर डोक्यावर चार काचेचे ग्लास ठेवले आहेत. त्याच्यावर त्यानं एक गॅस सिलेंडर उभा केला आहे. सिलेंडरवर त्यानं दोन हांडे ठेवलेत. तरुणानं या वस्तूंना हात न लावता डोक्यावर उभ्या ठेवल्या आहेत. तो सर्व वस्तूंना डोक्यावरुन पडू नये याच्या प्रयत्नात असून तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहे.
@praveen_prajapat1 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा खतरनाक स्टंट शेअर केला आहे. काही वेळातच व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसला. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून अनेकांनी त्याच्या धाडसाचं कौतुक केलं आहे तर काहींनी म्हटलं आहे हे पडलं तर मोठी इजा होऊ शकते. त्यामुळे असे खतरनाक स्टंट करणं अंगाशी येऊ शकतं. दरम्यान, तरुणाचा हा स्टंट बाजूला येणारे जाणारे लोक आश्चर्यानं बघत आहेत. एक महिला उत्सुकतेपोटी त्याचा व्हिडिओही बनवताना दिसून आली. यापूर्वीही असे स्टंट व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दिवसेंदिवस असे निरनिराळ्या स्टंटचे व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात करत आहेत.