मुंबई, 29 मे : सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. बरेच विचित्र स्टंट, चॅलेंज, गेम व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका विचित्र खेळाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दोन तरुणींनी एकमेकींसोबत इतका विचित्र खेळ खेळला आहे. जो पाहून तुम्ही हैराण व्हाल. याला आता काय म्हणावं तेच समजेना झालं आहे. असा गेम तुम्ही याआधी कधीच पाहिला नसाला
(Girl slap each other).
लहान मुलांना तुम्ही पाहिलं असेल एकाने मारलं की दुसराही त्याला मारतो. मग असेच ते रागात एकमेकांना मारत राहतात पण एकही माघार घेत नाही. असंच काही या तरुणी करत आहेत. पण त्या रागात नव्हे तर आनंदात. म्हणजे त्या एकमेकींना मारण्याचा गेम खेळत आहे. दोघीही एकमेकींच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. only._.sarcasm_ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
हे वाचा - बापरे! श्वानाच्या तोंडात घुसला जगातील सर्वात विषारी साप; वाचवण्यासाठी मालकिणीने हात टाकला अन्...
व्हिडीओत पाहू शकता दोन तरुणी एकमेकींच्यासमोर उभ्या आहेत. त्यांच्यासमोर तिसरी व्यक्ती त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे. एक तरुणी दुसऱ्या तरुणीच्या गालावर जोरात मारते. आता कुणी आपल्याला मारलं तर राग येणार नाही का? पण ही तरुणी मात्र हसताना दिसते. तिला जोरात लागलं असं ती सांगतेसुद्धा. त्यानंतर ती त्या पहिल्या तरुणीला थोबाडीत मारते. तिलाही जोरात लागतं.
त्यानंतर दोघीही एकमेकांवर अशाच एकामागोमाग सटासट थप्पडांचा वर्षाव करताना दिसतात. दोघींपैकी कुणीच मागे हटायला बघत नाही. जितक्या आनंदाने त्या मारतात तितक्याच आनंदाने त्या मार खातानाही दिसतात.
हे वाचा -
शेरास सव्वाशेर! बाबांच्या मारावर चिमुकल्या लेकाचा 'डायलॉगवार'; VIDEO पाहून पोट धरून हसाल
हा गेम खेळणं दूर फक्त पाहूनच तुमचं डोकं भिरभिरेल आणि कानही बंद झाल्यासारखे वाटतील. कारण या तरुणी जो गेम खेळत आहेत, तो असा पाहायला साधा वाटत असला तरी हा खेळ तसा खतरनाक आहे. कारण याचे काहीही दुष्परिणाम होऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.