नवी दिल्ली, 19 जुलै : प्राण्यांना जवळून पहायला, त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यायला, अनेक लोक जंगल सफारी आणि पार्कमध्ये जातात. काही पार्कमधील प्राण्यांना तर जवळून हात लावता येतो, त्यांना खायला चारता येतं, फोटो, व्हिडीओ काढता येतात. सोशल मीडियावर तर असे पार्कमधील प्राण्यांचे आणि पर्यटकांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये तरुणी सिंहासोबत एकाच ताटात खाताना दिसली. तरुणी सिंहाच्या ताटात जेवतानाचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तरुणीच्या धाडसाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंह बसून ताटामध्ये मांस खात आहे. एक तरुणी त्याच्या शेजारी बसून त्याच्या ताटातील खात आहे. हे दृश्य पाहून तुमचेही डोळे मोठे होतील. तरुणीचं धाडस पाहून थक्क व्हाल. संयुक्त अरबमधील वाईल्ड लाईफ पार्कमधील हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे.
@rak_zoo नावाच्या अकाऊंटवर या तरुणीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी तरुणीच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. तर काहींना असं धाडस जीवाशी येऊ शकतं असं म्हटलं. दरम्यान, अनेकदा पार्क आणि जंगल सफारीदरम्यानचे बरेच व्हिडीओ समोर येत असतात. कधी प्राणी पर्यटकांवर हल्ला करताना दिसतात तर कधी पर्यटक प्राण्यांना त्रास देताना दिसतात.