व्हिडीओत पाहू शकता एक तरुणी बाईकवर बसली आहे. ती बाईक स्टार्ट करण्याचा प्रयत्न करते. बाईकला कीक मारते. बाईकला लागोपाठ किती तरी वेळा जोरात कीक मारते. कीक मारून मारून बाईक तर काही स्टार्ट होत नाही. अखेर ती वैतागून इतक्या जोरात कीक मारते की बाईकचं कीकच तुटून पडतं. हे वाचा - VIDEO - नशीब म्हणावं की चमत्कार! आधी बाईकला धडकला, नंतर बससमोर आला; भयंकर अपघातातूनही बचावला चिमुकला @comedynation.teb नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. युझर्सना हा व्हिडीओ आवडला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. ही स्त्री आहे, पापा की परी आहे काहीही करू शकते, अशी कमेंट बऱ्याच नेटिझन्सनी केली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नेमकं काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Woman Driver