जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हॉरर चित्रपट पाहून मुलगी करु लागली असं काही...Video पाहून बसेल धक्का

हॉरर चित्रपट पाहून मुलगी करु लागली असं काही...Video पाहून बसेल धक्का

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

आजकाल प्रसिद्धी झोतात येण्यासाठी तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वचजण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 2 मार्च : आजकाल प्रसिद्धी झोतात येण्यासाठी तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वचजण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर फॉलोवर्स वाढण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी सर्वजण हटके फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. सध्या एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीमध्ये एक मुलगी डान्स करताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती हॉरर चित्रपटातील गाण्यातील मुलीप्रमाणे कपडे घालून हुबेहुब तिच्यासारखा हॉरर डान्स करत आहे. मागे टीव्ही असून ती टीव्हीकडे पाठ दाखवत आणि कॅमेऱ्याकडे तोंड करत हा भयानक डान्स करत आहे. डान्स करताना टीव्हीतील मुलीप्रमाणेच ही मुलगीदेखील भयानक दिसत आहे. तिला पाहून काही वेळासाठी तुम्हालाही भीती वाटल्याशिवाय राहणार नाही.

जाहिरात

हा व्हायरल व्हिडीओ kasumovic_ella नावाच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा मुलीचा व्हायरल डान्स व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंट आणि लाईक्सचाही वर्षाव होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी लोक काहीतरी हटके आणि वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी काहींचा प्रयत्न फेल होतो आणि त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ किंवा फोटोंना संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात