जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हाताच्या वापराशिवाय मोबाईल स्क्रोल करतेय मुलगी, Video पाहून चक्रावून जाल

हाताच्या वापराशिवाय मोबाईल स्क्रोल करतेय मुलगी, Video पाहून चक्रावून जाल

हाताशिवाय मोबाईलचा वापर

हाताशिवाय मोबाईलचा वापर

लोकांना कशाचा कंटाळा येईल आणि लोक त्यासाठी काय जुगाड करतील कोणीही अंदाज लावू शकत नाही. जगभरात अशा जुगाडू लोकांची काही कमतरता नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 जून : लोकांना कशाचा कंटाळा येईल आणि लोक त्यासाठी काय जुगाड करतील कोणीही अंदाज लावू शकत नाही. जगभरात अशा जुगाडू लोकांची काही कमतरता नाही. सोशल मीडियावर तर असे जुगाडू लोकाचे फोटो आणि व्हिडीओ सतत व्हायरल होताच. नुकताच एक तरुणीचा जुगाडू व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ती हातांचा वापर न करता मोबाईलचा वापर करत आहे. आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचं व्यसन लागलं आहे. दिवसभरातील अनेक तास ते मोबाईचा वापर करण्यात घालवतात. यामुळे अनेकांचे डोळे, हात शकतात. एका तरुणीने मोबाईल वापरताना हात थकू नये यासाठी हटके जुगाड केला आहे. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रुममध्ये अनेक तरुणी दिसत आहे. प्रत्येकजण काही ना काही करत आहे. यातीलच एक मुलगी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण ती मोबाईल वापरताना हाताचा वापर न करता स्क्रिन पुढे ढकलत आहे. खरंतर ही मुलगी बेडवर झोपली आहे. दोन्ही पायांमध्ये उशी पकडली असून तिने मोबाईल उशीला टेकवला आहे. आणि हात बेडवर स्थिर ठेवलेत. तरीही तिच्या मोबाईलची स्क्रीन पुढे मागे होत आहे. तिच्या तोंडात एक पिपाणी दिसत आहे. याच्या सहाय्याने ती व्हिडीओ पुढे ढकलत आहे. मुलीचा हा जुगाड पाहून नेटकऱ्यांनीही डोक्याला हात लावलाय.

जाहिरात

@NoContextHumans नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 6 सेकंदांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक कमेंट पहायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात