महिला वेटर एखाद्या प्रोफेशनल ज्युडो, कराटे एक्सपर्टप्रमाणे या दोन्ही तरुणांची धुलाई करते. या व्हिडीओमुळे अशी छेडछाड करणाऱ्या तरुणांना चांगलाच धडा मिळाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर ते कोणत्याही महिलेला छेडण्याची हिंमतही करणार नाही. महिलेला छेडण्यापूर्वी दहा वेळा तरी विचार करतील. हे वाचा - मोठ्या माणसांनाही लाजवेल असं चिमुकल्याचं काम; सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय हा VIDEO LovePower ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. महिलेला धमकावणं बंद करा, इथं काय झालं आहे पाहा, असं कॅप्शन हा व्हिडीओ पोस्ट करताना ट्विटरवर देणअयात आलं आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, लाइक केला आहे. त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतेकांनी महिलेच्या हिमतीचं कौतुक केलं आहे.dont bully woman! see what happened here! 😍😍👏👏👍👍pic.twitter.com/zt3XaSJXC4
— LovePower (@LovePower_page) June 11, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos