मराठी बातम्या /बातम्या /Viral /...अन् अचानक व्यक्तीच्या मागे धावली महाकाय मगर, हृदयाचा ठोका चुकवणारा Video

...अन् अचानक व्यक्तीच्या मागे धावली महाकाय मगर, हृदयाचा ठोका चुकवणारा Video

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडिया माध्यमांद्वारे लोकांशी जवळीकता वाढली असून तुम्ही ऑनलाईन दूरच्या व्यक्तींशीही संपर्क साधू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : सोशल मीडिया माध्यमांद्वारे लोकांशी जवळीकता वाढली असून तुम्ही ऑनलाईन दूरच्या व्यक्तींशीही संपर्क साधू शकता. सोशल मीडियावर मनोरंजनाच्याही अनेक गोष्टी पहायला मिळतात. खास करुन व्हायरल व्हिडीओ. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. यापैकी पक्षी आणि प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात पाहिले जात आहे. असे व्हिडीओ लवकर इंटरनेटवर व्हायरल होतात. अशातच एका महाकाय मगरीचा व्हिडीओ समोर आला असून ती माणसाच्या मागे धावताना दिसत आहे.

सध्या समोर आलेला व्हायरल व्हिडीओ महाकाय मगरीचा असून ती एका व्यक्तीच्या मागे वेगाने धावताना दिसत आहे. मगरीला पळताना पाहून नेटकरीही थक्क आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 6 सेकंदांच्या या व्हिडीओने तुमचेही हृदयाचे ठोके चुकल्याशिवाय राहणार नाही.

@TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर मिलियन्सवर व्ह्युज आले असून लाखांच्या घरात लाईक्, आले आहेत. अनेकांनी या ट्विटला रिट्विटदेखील केलं आहे. नेटकरी व्हिडीओवर प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत. सहसा, मगरी पाण्याच्या आत आणि बाहेर शिकार शोधताना दिसतात. जिथे ते पाण्याच्या आत खूप वेगवान असतात. दुसरीकडे, त्यांच्या जड शरीरामुळे, त्या जमिनीवर वेगाने चालू शकत नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झालेत.

जगभरात अनेक प्रकारचे धोकादायक प्राणी आढळतात. जो आपल्या शिकारीतील निपुणतेमुळे प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण करतो. अलीकडच्या काळात जंगलात आढळणाऱ्या सिंह, बिबट्या, वाघांपासून ते पाण्याखाली सापडणाऱ्या मगरींपर्यंत शिकार करताना दिसतात. ज्याच्या हल्ल्यातून कोणत्याही सजीवाला वाचणे अत्यंत अशक्य होते.

First published:

Tags: Crocodile, Shocking news, Shocking viral video, Social media viral, Top trending, Video viral