नवी दिल्ली, 19 जुलै : टोमॅटो सध्या चांगलाच भाव खात आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले दिसत आहेत. त्यामुळे काही लोकांनी तर महागाईमुळे टोमॅटो खाणंही सोडलंय. विक्रेत्यालाही दुकानात टोमॅटोचं रक्षण करण्यासाठी गार्ड ठेवावे लागत आहेत. यावरुन सध्या टोमॅटोचं महत्त्व किती आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. टोमॅटो महागल्याचा फायदा बाकी विक्रेतेही घेत आहेत. वेगवेगळ्या स्किम आजमावत, टोमॅटोचा लोभ देऊन ते आपल्या वस्तू विकताना दिसत आहे. आत्तापर्यंत अनेक विक्रेत्यांचा भन्नाट जाहिराती सोशल मीडियावर समोर आल्या. आता यामध्ये भर पडली असून एका टॅटूच्या दुकानात टोमॅटोची ऑफर लावली असल्याचं पहायला मिळाली. हे प्रकरण काय आहे याविषयी जाणून घेऊया. एका टॅटू काढणाऱ्या व्यक्तीनं लोकांना टोमॅटोचं आकर्षण देत आपल्या दुकानाकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील वाराणसीतून समोर येत आहे. मग काय ही ऑफर ऐकून दुकानात महिलांती तुंबड गर्दी झाली.
वारणसीतू येत असलेल्या घटनेनं अनेकजण थक्क झाले. दुकानदाराने टॅटू बनवणाऱ्या ग्राहकांना टोमॅटो मोफत दिलं जाईल अशी ऑफर ठेवली आहे. टोमॅटोची किंमत जास्त असल्यानं लोक त्याचा फायदाही घेत आहेत. विशेषत: महिला या ऑफरसाठी दुकानात पोहोचत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दुकानात पोहोचलेल्या काही महिलांनी सांगितले की, त्या संधीचा फायदा घेण्यासाठी येथे आल्या आहेत. जगातले टॉप 5 सर्वात महागडे देश, पाहा भारत कितव्या क्रमांकावर दुकानातून टॅटू काढायचा असेल त्याला 1 किलो टोमॅटो मोफत देण्यात येईल, असं दुकानदारानं जाहीर केलं. दुकानदारानं सांगितलं की, श्रावण महिन्यात अनेक लोक दुकानात टॅटू काढण्यासाठी येतात, त्याच दरम्यान टोमॅटोचे भाव वाढले आहेत, म्हणून त्यांनी ही ऑफर ग्राहकांना दिली. या ऑफरमुळे त्याच्या दुकानात जास्त लोक टॅटू काढण्यासाठी येतील. दरम्यान, टोमॅटो महाग झाल्यामुळे लोकांचं बजेट कोलमडलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी टोमॅटोचे भाव वेगळे असल्याचं दिसत आहे. कुठे टोमॅटोचा भाव 150 आहे तर कुठे 160 किलो ने टोमॅटो विकला जात आहे.