नवी दिल्ली, 29 मार्च : आत्तापर्यंत खाण्याच्या पदार्थांवर अनेक ट्रायल झाले आहेत. प्रत्येकजण काहीतरी खाण्याचा नवीन प्रकार घेऊन समोर येत असतं. मात्र कधी कधी असं फ्युजन बनवतात जे पाहूनच नको वाटतं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अशा खाण्याच्या फ्युजनचा ट्रेंडच बनत चालला आहे. आपण विचारही करु शकत अशा रेसिपी लोक शोधून आणतात. अशातच यामध्ये आणखी एका खाद्यपदार्थाची भर पडली असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगलीये. सध्या समोर आलेल्या खाद्यपदार्थाच्या फ्युजनचं नाव आहे ‘बिर्याणी समोसा’. याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, समोस्यामध्ये बटाट्याचा सारण ऐवजी बिर्याणी भरलेली आहे. त्यामुळे सध्या हा बिर्याणी समोस्याचा फोटो सर्वांचं लक्ष वेधत आहे. अनेकजण या फ्युजनचं कौतुक करत आहेत तर काहीजण याविषयी राग व्यक्त करत आहे.
presenting biryani samosa pic.twitter.com/i5wBCrNF7Y
— glorified bawarchi (@khansaamaa) March 26, 2023
@khansaamaa नावाच्या अकाऊंटवरून या बिर्याणी समोशाची दोन छायाचित्रे ट्विटरवर पोस्ट करण्यात आली आहेत. अगदी काही वेळातच हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. समोस्याचा हा नवा प्रकार सध्या चर्चेत असून याविषयी अनेक प्रतिक्रिया येत आहे. या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळतायेत.
दरम्यान, समोसा हा भारतातील लोकप्रिय नाश्त्यापैकी एक मानला जातो. त्यामुळे अनेकजण दिवसभरातून याचं सेवन करतातच. आजकाल याचेही नवनवीन प्रकार पहायला मिळतायेत. यामध्ये याचं नवीन फ्युजन काही लोकांना आवडतंय तर काहींना याविषयी किळस वाटतेय. या बिर्याणी समोस्याचा पोस्ट अनेक व्ह्युज मिळाले आहेत.

)







