नवी दिल्ली, 06 जून : लग्नाचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र लग्नांची धूम पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असलेले पहायला मिळत आहे. डान्स व्हिडीओ, मिरवणुकीचे व्हिडीओ, विधींचे व्हिडीओ, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. नुकताच लग्नाच्या मिरवणुकीचा एक व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. एक व्यक्ती मिरवणुकीत घोड्याच्या समोर हटके स्टाईलने बेभान होऊन नाचत आहे. मात्र त्याचा हा अजब डान्स मिरवणुकीसाठी आणलेल्या घोड्याला आवडत नाही. घोड्याच्या मागे जाऊन नाचणं व्यक्तीला महागात पडतं आणि घोडा त्याला लाथ मारतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नाची मिरवणुक दिसत आहे. या मिरवणुकीत एक व्यक्ती बेभान होऊन नाचतोय. नाचता नाचता तो समोर उभ्या असलेल्या घोड्याच्या मागे जातो. घोडा त्याला जोरात लाथ ठेवून देतो आणि व्यक्ती जोरात खाली कोसळतो. मात्र हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
@iama11__ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. 22 मे रोजी अपलोड केलेल्या या क्लिपला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर लोकांनी त्यावर मजेदार कमेंट्स दिल्या आहेत. व्हिडीओ अजूनही चर्चेत असून अनेकवेळा पाहिला जात आहे.