जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : माणसांप्रमाणे आनंदात पोहताना दिसला बेडूक, स्वॅग पाहून म्हणाल अस्सं जगता यायला हवं!

Viral Video : माणसांप्रमाणे आनंदात पोहताना दिसला बेडूक, स्वॅग पाहून म्हणाल अस्सं जगता यायला हवं!

माणसांप्रमाणे मजेत पोहताना दिसला बेडूक

माणसांप्रमाणे मजेत पोहताना दिसला बेडूक

जगात अनेक थक्क करणाऱ्या घटना घडत असतात. जगाच्या पाठीवर कुठे काय घडेल आणि काय व्हायरल होईल कोणीही सांगू शकत नाही. अनेक आश्चर्यकारक फोटो, व्हिडीओ, घटना सोशल मीडियावर व्हायरल होतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 जून : जगात अनेक थक्क करणाऱ्या घटना घडत असतात. जगाच्या पाठीवर कुठे काय घडेल आणि काय व्हायरल होईल कोणीही सांगू शकत नाही. अनेक आश्चर्यकारक फोटो, व्हिडीओ, घटना सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच थक्क करणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये बेडूक चक्क माणसांसारखं पोहताना दिसतोय. बेडकाची ही मस्ती सर्वांचं लक्ष वेधत आहे. बेडकाचा मजेशीर व्हिडीओ पाहून तुमच्याही भुवया उंचावतील. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बेडूक मस्त निवांत पाण्यामध्ये उलटं होऊन पोहत आहे. तो माणसांप्रमाणे पोहताना पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. नदी किंवा स्विमिंग पूलमध्ये माणूस पोहतो त्याच पद्धतीने हा बेडून पोहत आहे. बेडूक इकडून तिकडे पाण्यात पोहत आहे तर इतर अनेक बेडूक जे एका जागी स्थिर आहेत आणि काही सरळ पोहत आहेत. पण त्यापैकी फक्त हा एक बेडूक माणसांप्रमाणेच आनंदाने पोहताना दिसतो.

News18लोकमत
News18लोकमत

बेडकाचा हा मजेशीर व्हिडीओ @waowafrica नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे. व्हिडीओवर निरनिराळ्या कमेंटही येताना दिसतायेत. एक यूजर लिहिलतो, हा बेडूक खूप मस्त आहे. दुसऱ्याने कमेंट केली आहे की तो त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण एन्जॉय करत आहे. आणखी एका युजरने लिहिले आहे, अरे तेरी, खूप गोंडस बेडूक.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात