जाहिरात
मराठी बातम्या / Viral / फ्रीजचा होऊ शकतो स्फोट, तुम्ही करू नका 'या' चुका; वाचा काय सांगतात मेकॅनिक

फ्रीजचा होऊ शकतो स्फोट, तुम्ही करू नका 'या' चुका; वाचा काय सांगतात मेकॅनिक

फ्रीज

फ्रीज

या महिन्याच्या सुरुवातीला तमिळनाडूमधल्या कोईमतूर जिल्ह्यातल्या पोल्लाची शहरात फ्रीजचा स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 26 मार्च : या महिन्याच्या सुरुवातीला तमिळनाडूमधल्या कोईमतूर जिल्ह्यातल्या पोल्लाची शहरात फ्रीजचा स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अयनावरम पोलीस स्टेशनमधले 41 वर्षांचे इन्स्पेक्टर पी. सबरीनाथ आणि तळमजल्यावर राहणारे 38 वर्षीय भाडेकरू एस. शांती यांचा या घटनेत मृत्यू झाला. 9 मार्च रोजी सबरीनाथ यांच्या घरात मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला आणि त्यापाठोपाठ खिडक्यांमधून धूर निघाला. त्यामुळे शेजाऱ्यांनी सतर्क होऊन अग्निशमन विभागाला वर्दी दिली. घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना सबरीनाथ आणि भाडेकरू पाण्याने भरलेल्या घरात मृतावस्थेत आढळले. हेही वाचा -   ‘ही’ हत्तीण खेळतेय चक्क क्रिकेट आणि फुटबॉल! पाहण्यासाठी लोकांची गर्दी, पाहा Video या घटनेने प्रत्येक जण घाबरून गेला आहे. कारण, रेफ्रिजरेटर हे प्रत्येक घरात असणारं एक सामान्य उपकरण आहे. या घटनेनंतर न्यूज 18ने कोइमतूरमधले फ्रीज मेकॅनिक बालाजी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही विशिष्ट परिस्थितीत रेफ्रिजरेटरचा स्फोट होऊ शकतो. बालाजी म्हणाले, “मी 25 वर्षांपासून या व्यवसायात आहे. आता इन्व्हर्टर तंत्रज्ञानावर चालणारे रेफ्रिजरेटर बाजारात आले आहेत. फ्रीज चालवण्यासाठी स्वयंपाकाचा गॅस वापरला जातो. फ्रीजमधला 80 टक्के भाग या गॅसवर चालतो. हा गॅस रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरमध्ये भरला जातो. त्यामुळे कॉम्प्रेसर जास्त गरम होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. बऱ्याच काळासाठी घराबाहेर जाण्याच्या विचारात असाल तर अशा वेळी फ्रीज बंद करून जाणं, हा चांगला पर्याय आहे. याशिवाय, डीप फ्रीझरच्या सेक्शनमध्ये वस्तूंची जास्त गर्दी करू नये. कारण, यामुळे कॉम्प्रेसर सहज गरम होतो.” रेफ्रिजरेटरच्या मागच्या बाजूस कॉम्प्रेसर असतो. सामान्यतः तिथूनच फ्रीजशी संबंधित समस्या सुरू होतात. कॉम्प्रेसर कार रेडिएटरप्रमाणे काम करतो. तो फ्रीझर आणि रेफ्रिजरेटरमधून सर्व उष्णता शोषून घेतो आणि उत्पादनांसाठी आदर्श स्टोरेज तापमान राखण्याकरिता आतला भाग थंड करतो. रेफ्रिजरेटरला थंड करणारा वायू अधूनमधून कॉम्प्रेसरमध्ये अडकतो. त्यामुळे रेफ्रिजरेटरचा मागचा भाग खूप गरम होतो. रेफ्रिजरेटरचा कॉम्प्रेसर अडकलेल्या वायूमुळे ब्लॉक होतो. परिणामी एक दाब तयार होतो आणि शेवटी त्याचा स्फोट होतो, असं बालाजी यांनी सांगितलं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    स्फोटासारख्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी सध्या बाजारात उपलब्ध असलेले स्मार्ट रेफ्रिजरेटर वापरू शकता. हे रेफ्रिजरेटर आपल्या अंतर्गत प्रणालीमध्ये काही बिघाड झाला असल्यास, वापरकर्त्यांना ऑटोमॅटिक वॉर्निंग देतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: food , Viral
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात